सेवा संकल्प अभियान अंतर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्रात पालक कार्यशाळा व बाल फिजिओथेरपी शिबिर उत्साहात

जालना/प्रतिनिधी,दि.29
सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जालना येथे पालक कार्यशाळा व बाल फिजिओथेरपी शिबिर दि.28 रोजी उत्साहात पार पडले. या उपक्रमात दिव्यांग बालकांना पुनर्वसन सेवा तसेच त्यांच्या पालकांना आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.
पालक कार्यशाळेस सुमारे 80 पालक उपस्थित होते. तसेच शिबिरासाठी 63 बालकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 60 बालकांनी बाल फिजिओथेरपी सेवेचा लाभ घेतला. दिव्यांग बालकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. श्वेता शिंदे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. दिव्यांग बालकांच्या विकासासाठी वेळेवर हस्तक्षेप, नियमित फिजिओथेरपी, घरच्या घरी नियमित व्यायाम आणि पालकांचा सातत्यपूर्ण सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक बालकाची क्षमता लक्षात घेऊन उपचार व प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प व उद्योगाचे माजी प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, फिजिओथेरपिस्ट आणि पालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती अस्मिता मित्तल यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या उपक्रमामुळे दिव्यांग बालकांना पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या पालकांना आवश्यक मार्गदर्शन मिळाले. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी यांच्या टीममधील श्री. पाखरे, तनया, शैलेन्द्र कापसे (दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी), जिल्हा परिषद जालना तसेच प्रकल्प समितीचे डी. टी. सोनी (अध्यक्ष), सौ. हेमल अमृत माने (कोषाध्यक्ष), राजू भाऊराव शिरसाठ (कार्यवाह), दिपाली त्र्यंबक अरगले (सदस्य), डॉ. संजय मारुती (सदस्य), दीपक सुनिल गायकवाड (सदस्य), नितीन बंडलकर (सदस्य), डॉ. उमेश बंडलकर (सदस्य), भानुदास लक्ष्मण डोबाळे (सदस्य) यांचे सहकार्य लाभले.
तसेच आज कॅलेज ऑफ फिजिओथेरपीचे माजी सहकारी लाभले. महाविद्यालयाच्या वतीने डॉ. मानसी जाधव तसेच फिजिओथेरपी विभागाचे सहकारी यांनी बालकांच्या फिजिओथेरपी सेवेत मार्गदर्शन केले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील फिजिओथेरपिस्ट डॉ. मिताली पंडित, स्वप्ना शेरकर तसेच सौ. निशा मंत्री आणि श्री. विजय देशपांडे (लेखापाल), श्री. विजयकांत किंगरे, श्री. गणेश ओंगरे, सौ. सत्यभामा भुतेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.




