pub-7425537887339079
ब्रेकिंग

खासदार डॉ. कल्याण काळे व माजी आमदार चंद्रकांत दानवे यांची जाफ्राबाद येथील साखळी उपोषणस्थळी भेट

0 4 7 9 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

एससी उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी जाफ्राबाद तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला आज खासदार डॉ. कल्याण काळे व माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी भेट देऊन आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेत त्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडे योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दि. १८ जून २०२६ पासून समस्त बौद्ध समाज तसेच एससी उपवर्गीकरण विरोधी समन्वय समिती, तालुका जाफ्राबाद यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. एसी प्रवर्गातील ५९ जातींवरील अन्याय दूर करून एससी उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात तालुक्यातील विविध गावांतील महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. उपोषणस्थळी भेटीदरम्यान खासदार डॉ. कल्याण काळे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या, उपोषणाची पार्श्वभूमी तसेच शासनाकडून अपेक्षित असलेल्या निर्णयाबाबत माहिती घेतली. माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनीही आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या भावना समजून घेतल्या. आंदोलनकर्त्यांनी शासनाने एससी उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, तसेच सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी दोन्ही लोकप्रतिनिधीं समोर मांडली. आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी समन्वय समितीचे पदाधिकारी, विविध गावांतील प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे