pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी बसस्थानकाला अतिक्रमणाचा फास, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

प्रवेशद्वारावरील हॉटेल आणि टपऱ्यांमुळे एसटी बसेसना वळायलाही मिळेना जागा

0 4 6 1 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4

टेंभुर्णी शहराचे मुख्य बसस्थानक सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. रस्त्याच्या दुतर्फा आणि बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक आणि दुकानदारांनी बस्तान मांडल्याने मुख्य रस्ता अतिक्रमणाखाली गेला आहे. या भयंकर वाहतूक कोंडीमुळे दररोज हजारो प्रवाशांचे हाल होत असून, या रस्त्याची जबाबदारी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

बसस्थानकात दररोज शेकडो बसेस आणि हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, हॉटेल व्यावसायिकांनी आपले बाकडे, गाडे आणि शेड थेट रस्त्यावर आणल्याने ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे एसटी बसेसना आत वळण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जागाच उरत नाही. बसस्थानक परिसरात सतत कोंडी होत असल्याने तासनतास ट्रॅफिक जाम होते. शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना

पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे

संबंधित गाळेधारकांना स्थानिक ग्रामपंचायतीकडून अतिक्रमणासंदर्भात नोटीस देणे आवश्यक आहे. महामार्गावर उभ्या राहणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे रहदारीला अडचण निर्माण होत असून, स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक गजानन देठे यांनी केली आहे.

पायी चालण्यासाठी साधी फूटपाथची जागाही उरलेली नाही.

अतिक्रमण झालेली जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते. मात्र, या विभागाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी किंवा

कारवाई करण्यासाठी फिरकत नाहीत. डोळ्यांसमोर सरकारी जागेवर अतिक्रमण होत असताना अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने त्यांचा अतिक्रमणधारकांशी काही अर्थपूर्ण संबंध आहे का,

असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

वाहतूक कोंडीमुळे एसटी बसला वळण घेताना रस्त्यावरील गर्दीत एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील सर्व अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा. जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे