अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगारांच्या राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक जेष्ठ कामगार नेते एस.के. शेट्टे यांच्या अध्यक्षतेखाली जेएनपीएच्या विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने बंदर कामगारांच्या वेतन आणि बोनस,बढती तसेच भविष्य निर्वाह निधीतील वाढ या मागण्यांवर सरकार आणि बंदर प्रशासनाने लवकरात निर्णय घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या बैठकीसाठी देशातील अकरा बंदरातील पाच बंदर कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जेएनपीएचे कामगार नेते व भारतीय मजदूर संघांचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील,विश्वस्त दिनेश पाटील,रवींद्र पाटील,माजी विश्वस्त कॉ. भूषण पाटील,कामगार नेते सुधीर घरत,गणेश घरत आदीजन उपस्थित होते. बंदर विभागाकडून २०२० -२१ ते २०२५-३६ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी लागू होणारा बोनस करार मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. यामध्ये उचल वजा करून उर्वरित रक्कम संबंधितांना परत देण्याचेही मान्य करण्यात आले आहे.
या बैठकीला भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ,ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन, इंडिया फोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन, वॉटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन, पोर्ट डॉक अँड वॉटर फ्रंट फेडरेशन ऑफ इंडिया यांचे नेते उपस्थित होते. बंदर कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित असून देशातील सहा बंदर कामगार महासंघाच्या वतीने सरकार आणि बंदर व्यवस्थापनाशी चर्चा करूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही. प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे अनेकवर्षापासून कामगारांच्या बढती थांबल्या आहेत. या विरोधात कामगारांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता.
अंबड मध्ये धान्याच्या काळ्याबाजारीवर मोठी कारवाई: काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 6.37 लाखांचा शासकीय/शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा जप्त; एकावर गुन्हा दाखल
15 hours ago
एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात २८ जुलै रोजी जाफ्राबादमध्ये विराट जनआक्रोश मोर्चासाठी विविध स्तरातून सहकार्याचा वर्षाव
15 hours ago
चित्रकार संतोष आवटी यांच्या वारीच्या 108 चित्र प्रदर्शनास वेद रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सर्वेसर्वा डॉक्टर रवींद्र पाटील यांच्या शुभेच्छा, आवटी यांचा सत्कार
15 hours ago
एकट्याने पंढरीची वारी; माजी सरपंचाचा अनोखा संकल्प
2 days ago
वीर वाजेकर महाविद्याल फुंडे चा अथर्व गाताडी भारतीय नौसेनेत अग्निवीर म्हणून निवड.
2 days ago
त्रिमुर्ती दिव्यांगाचा जन्म अभिष्टचिंतन व दिव्यांग मेळाव्यात आलेल्या दिव्यांगाचा सन्मान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या तर्फे सन्मान माहुर येथे उत्साहात संपन्न
2 days ago
सोनम वांगचुक यांचे दीर्घकालीन उपोषण बेदखल! – मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन!
2 days ago
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विशेष तपासणी मोहिमेत 60 बसेसची तपासणी व 26 वाहनांवर कारवाई 1 लाख 90 हजाराचा दंड वसूल
2 days ago
काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला आघाडीतर्फे अर्जुन पाटील यांना श्रद्धांजली पत्रकार कृष्णा पाटील परिवाराच्या सांत्वनासाठी पंचक्रोशीतील मान्यवरांची रिघ
2 days ago
जाफराबाद तालुक्यात वेळेत पाऊस. न झाल्यास खरीपला धोका ,, तालुक्यात बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत