उपवर्गीकरण प्रक्रियेच्या विरोधातील जाफ्राबाद येथील बेमुदत साखळी उपोषणास उत्स्फूर्त प्रतिसाद
सामुदायिकरित्या दर दिवशी एक-एका गावातील उपोषणकर्ते साखळी उपोषणात होतात सहभागी

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8
अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या अ.ब.क.ड उपवर्गीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जन आंदोलनाला जाफ्राबाद तालुक्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाफ्राबाद तालुक्याच्या वतीने समस्त बौद्ध समाज व अनुसूचित जातीतील विविध समाज घटकांच्या नेतृत्वाखाली दिनांक १८ जून २०२६ पासून तहसील कार्यालय,जाफ्राबाद येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की,अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेमुळे भारतीय संविधानाने अनुसूचित जातींना प्रदान केलेल्या सामाजिक न्याय,समता आणि आरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रक्रियेमुळे अनुसूचित जातींमध्ये मतभेद निर्माण होऊन सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचू शकते. या आंदोलनाद्वारे शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत : १.अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाचे अ.ब.क.ड उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे.२.अनुसूचित जातींचे घटनात्मक हक्क अबाधित ठेवून विद्यमान संविधानिक आरक्षण व्यवस्थेचे संरक्षण करण्यात यावे.३.अनंत बदर समितीने राज्यातील सर्व अनुसूचित जाती घटकांचा समावेशक व प्रत्यक्ष अभ्यास केलेला नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.४.समितीसमोर दावे व हरकती सादर करण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी तसेच प्राप्त सर्व हरकतींवर सुनावणी घेऊन न्याय्य कारक निर्णय करण्यात यावा.५. शासनाने उपवर्गीकरणा संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत जनगणना आकडेवारीचा आधार घ्यावा. तसेच राज्यातील सर्व अनुसूचित जाती घटकांचे प्रतिनिधित्व असलेली स्वतंत्र अभ्यास समिती व तज्ज्ञ समिती गठित करून त्यामध्ये बौद्ध समाजासह सर्व प्रमुख अनुसूचित जाती समाजघटकांच्या प्रतिनिधींना स्थान द्यावे.आणि महत्वपूर्ण म्हणजे न्यायमूर्ती अनंत बदर समिती तात्काळ रद्द करण्यात यावी. आंदोलकांनी स्पष्ट केले की,हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण,संविधानिक मार्गाने व कायद्याचे पालन करून सुरू आहे. शासनाने या बेमुदत साखळी उपोषणाची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन,मोर्चे व इतर लोकशाही मार्गांचा अवलंब करण्यात येईल,असा इशारा आयोजकांनी दिला आहे. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या : १) अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे. २) न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करण्यात यावा. ३) सर्व संबंधित पक्षकारांना आक्षेप व दावे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देऊन न्याय्य सुनावणीची संधी देण्यात यावी. ४) उपवर्गीकरणाच्या विषयावर विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा करण्यात यावी. ५) सन २०२७ च्या जनगणनेनंतर उपलब्ध होणाऱ्या अद्ययावत इम्पिरिकल (Empirical) डेटाच्या आधारेच कोणताही निर्णय घेण्यात यावा. समस्त बौद्ध समाजाचा हा संघर्ष सामाजिक न्याय,घटनात्मक हक्क आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी सुरू असून,शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. याशिवाय,जाफ्राबाद तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना,सर्व राजकीय पक्ष,विविध समाजघटक व नागरिकांना एकत्र घेऊन येत्या काळात जाफ्राबाद येथे रास्ता रोको,पुरुष/मुलं मुंडन आंदोलन,थाळी वाजवून कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन केल्या जाईल, सुमारे हजारोंच्या संख्येने नागरिकांचा विराट मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. रास्ता रोको,पुरुष/मुलं मुंडन आंदोलन,थाळी वाजवून कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन केल्या जाईल. – समस्त बौद्ध समाज एससी उपवर्गीकरण विरोधी समन्वय समिती तालुका जाफ्राबाद, जिल्हा जालना आयोजक : समस्त बौद्ध समाज व अनुसूचित जातीतील विविध समाजबांधव.




