टेंभुर्णीच्या डॉक्टर पंडित सुरेश सह, नऊ धावपटूंनी अहिल्यानगरच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी, ७७ वर्षीय धावपटू उत्तमराव गुंड यांनी १० किमी अंतर तासात केले होते पार करत सर्वांचे लक्ष वेधले

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29
इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर वय व अंतराची बंधने झुगारत जाफराबादच्या धावपटूंनी अहिल्यानगर येथील मॅरेथॉन स्पर्धेत आपल्या यशाचा झेंडा रोवला. अहिल्यादेवी सायकल क्लबतर्फे आयोजित या भव्य मॅरेथॉनमध्ये जाफराबाद शहर व तालुक्यातील नऊ धावपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या सर्व यशस्वी क्रीडापटूंचा जाफराबादेतील वीर हनुमान मंदिर संस्थानच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला. अहिल्यानगर येथे अहिल्यादेवी सायकल क्लबतर्फे गेल्या महिन्यात ३१ मे रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या जवळपास १५०० हुन अधिक धावपटूंनी भाग घेतला होता. त्यात जाफराबाद व टेंभुर्णी येथील नऊ धावपटूही सहभागी झाले होते. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत जाफराबादच्या धावपटूंनी वेळेचे उत्तम गणित आखले. आपापली अंतरे पार केली. यामध्ये डॉ. पंडितराव सुरुशे यांनी ४२ किलोमीटरचे अंतर ४ तास ३० मिनिटांत कापले. राज्य उत्पादन अहिल्यानगरच्या मॅरेथॉनमध्ये टेंभुर्णी टेम्भूर्णी व जाफराबादच्या धावपटूंनी विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल हनुमान मंदिर संस्थांनने सत्कार केला. सर्व धावपटूंना प्रभू हनुमानाची प्रतिमा भेट देण्यात आली या सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यांना प्रभु हनुमानाची प्रतिमा भेट देण्यात आली. या सोहळ्याप्रसंगी सुरेश दिवटे, दशरथ सोळंके, मोहन मुळे, गिरीष साबदे, रमेश भोपळे, प्रभाकर गायकवाड, अॅड. राजेंद्र मगर, डॉ. रमेश हरणे, कैलास खंडेलवाल, नंदलाल गवळी, गणेश विभुते यांच्यासह परिसरातील नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, जाफराबादसारख्या ग्रामीण भागातील क्रीडापटूंनी मिळवलेले हे यश सध्या संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरले आहे. शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक रमेश विठोरे यांनी ४२ किलोमीटरचे अंतर ४ तास ५२ मिनिटांत पूर्ण केले. २१ किलोमीटरच्या अंतरामध्ये ब्रह्मानंद भिसे यांनी २ तास ३५ मिनिटांत अंतर कापले. एकनाथराव घाटगे यांनी २तास ५२ मिनिटांत अंतर कापले. डॉ. सावळे, राहुल मस्के आणि निलेश सुरुशे या तिघांनीही २१ किलोमीटरचे अंतर प्रत्येकी ३ तासांत पूर्ण केले. ___________________चौकट :-पिंपळखुटा येथील ७७ वर्षीय धावपटू उत्तमराव गुंड यांनी १० किलोमीटरचेअंतर अवघ्या १ तासात पार केले. सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिद्दीला वय नसते. आणि जास्त वयातही जिद्द कामी येत असते. हे दाखवून देण्याचं काम 77 वर्षे उत्तमराव गुंड यांनी दाखवून दिले. ____________`______ यासोबतच रत्नागिरीत आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम बक्षीस मिळवून तालुक्याचे नाव उंचावणाऱ्या १८ वर्षीय तरुणी तृप्ती ज्ञानेश्वर जाधव हिच्या देदीप्यमान यशाचाही यावेळी स्पर्धकांमध्ये विशेष गौरव करण्यात आला. या सर्व धावपटूंनी मिळवलेल्या यशातून आणि आरोग्याप्रती असलेल्या जागरूकतेतून समाजाला प्रेरणा मिळावी. त्यांचे आयुष्य निरोगी व सुखकर व्हावे. हाच या सत्कारामागील मुख्य उद्देश असल्याचे वीर हनुमान मंदिर संस्थानच्या वतीने सांगितले.



