बुधवार दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची विशेष सभा पी.एन.पी. माध्यमिक शाळा मोठी जुई येथे संघाचे मावळते अध्यक्ष सुधीर मुंबईकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी संघाचे संस्थापक अध्यक्ष नाथा नाईक,अरुण घाग,सूरदास राऊत,किशोर भोईर,संतोष म्हात्रे,प्रवीण पाटील,मिलिंद पट्टेबहादूर,मनोज म्हात्रे, सोनाली कोळी इत्यादी सदस्य उपस्थित होते. या सभेत संघाची नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली. अध्यक्ष म्हणून मिलिंद पट्टेबहादूर, उपाध्यक्ष सोनाली कोळी, सचिव पदी संतोष म्हात्रे आणि खजिनदार म्हणून प्रवीण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पी.एन.पी .शाळेचे मुख्याध्यापक किशोर भोईर यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकात संघाची स्थापनेपासूनची वाटचाल विशद केली .याप्रसंगी नाथा नाईक,अरुण घाग,सुभाष ठाकूर, संतोष म्हात्रे,कोळी मॅडम,सुधीर मुंबईकर या सर्वांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. सुधीर मुंबईकर यांनी सर्वांसाठी भोजनाची उत्तम प्रकारे व्यवस्था केली होती.मोठया उत्साहात सदर सभा संपन्न झाली. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4 hours ago
अपघातात महिलेचा मृत्यू, अल्पवयीन वाहन चालकांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात.
4 hours ago
“उरणचे वपोनि हनीफ मुलाणी यांना पदोन्नती; राज्य गुप्तवार्ता विभागात अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती”
4 hours ago
उरण-द्रोणागिरीत ‘सबवे’ झाला ‘तरण तलाव’, रुळावरून जीवघेणा प्रवास
5 hours ago
दिबांच्या नावासाठी तरुण पेटून उठले तर मी आजही नेतृत्व करायला तयार : भारतीताई पोवार. महेंद्रशेठ घरत यांनीही दिबांना केले अभिवादन
5 hours ago
प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले विनम्र अभिवादन.