उरण तालुक्यातील भेंडखळ येथे पोलीरीस कंपनीत समर्थ रायगड जनरल कामगार संघटने अंतर्गत कार्यरत असणारे इलेक्ट्रिशन व मेंटेनन्सचे काम करणारे कर्मचारी कार्यरत असून या कंपनीत समर्थ रायगड जनरल कामगार संघटना व जीएमसी मेंटेनन्स वर्क एल एल पी यांच्यात वेतन वाढीचा यशस्वी संपन्न झाला. या करारा अंतर्गत कामगारांना तीन वर्षासाठी प्रति महिना प्रति व्यक्ती ६२५० रुपये इतकी वेतन वाढ करण्यात आली आहे. तसेच पगारवाढी सोबत बोनस व इतर सेवा सुविधा जसे की रजा, सुरक्षा साहित्य, युनियनची देणी, थकबाकी आदी सुविधा कामगारांना मिळणार आहेत. या करारा प्रसंगी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भगत, युनियन लीडर नैनेश म्हात्रे, किशोर बनसोडे, जीएमसीचे मालक इरफान पटेल, ऍडमिन ऑफिसर अरुण माने, चिटणीस अजय पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून कामगारांनी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे तसेच जीएमसी मालक इरफान पटेल,पोलीरिस कंपनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून हे यशस्वी करार संपन्न झाल्याने संघटनेच्या कार्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड मोठ्या प्रमाणात सुरू असून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात संघटनेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उरणची वीज यंत्रणा ऍक्शन मोडवर. पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर
13 hours ago
स्वच्छतेच्या नावाखाली आकारल्या जाणाऱ्या दोन रुपये करामुळे प्रवाशी,नागरिकांच्या खिशाला बसणार कात्री सर्व स्तरातून होतेय टीका
13 hours ago
रायगड विक्रीला काढलाय का ? उरणमधील जमीन व्यवहारांवर राजाराम पाटील यांचा आरोप
2 days ago
श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा चिरनेर समितीच्या कार्यकारणी निवड.
2 days ago
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)रायगड, नवी मुंबई तर्फे आयोजित बेमुदत धरणे आंदोलनला २८ एप्रिल रोजी होणार एक वर्ष पूर्ण. विविध मागण्या साठी सतत अखंडितपणे पाठपुरावा सुरु. विविध मागण्यासाठी शेतकरी प्रकल्पग्रस्त एकत्र.