pub-7425537887339079
ब्रेकिंग

फिजिशियन असोसिएशनतर्फे डॉ. बळिराम बागल यांचा गौरव

0 4 1 2 0 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.12

जालना : जिल्ह्यात प्रथमच यशस्वी, उल्लेखनीय ऑर्गन रिट्रीव्हल (अवयव संकलन) प्रक्रिया पार पाडल्याबद्दल डॉ. बळिराम बागल संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बळिराम बागल यांचा फिजिशियन असोसिएशन ऑफ जालना यांच्या वतीने गौरव करण्यात आला.

ही ऐतिहासिक ऑर्गन रिट्रीव्हल प्रक्रिया नियोजनबद्ध, शास्त्रीय व नैतिक पद्धतीने यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या कार्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली असून, जिल्ह्याचा वैद्यकीय क्षेत्रातील मान उंचावला आहे. फिजिशियन असोसिएशन ऑफ जालना यांच्या वतीने आयोजित सतत वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमात गौरव सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बागल यांच्या कार्याचे कौतुक केले.

याबद्दल ‘live न्युज महाराष्ट्र‘ च्या परिवारातर्फे डॉ.बागल यांचे अभिनंदन!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 0 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे