pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरण महाविद्यालयामध्ये संशोधन कार्यशाळेचे आयोजन

0 4 2 1 0 0
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26

महाविद्यालयांमध्ये संशोधन पद्धती आणि संशोधनासाठी वित्तीय स्त्रोत या विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे व्याख्याते म्हणून डॉ. विलास गायकर सी.एच.एम.कॉलेज उल्हासनगर हे उपस्थित होते. त्यांनी संशोधन पद्धती, संशोधन प्रक्रिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधनाचे टप्पे , गृहीतके, संशोधक, माहिती गोळा करण्याच्या पद्धती, संशोधन लेखन, प्रकाशन, वित्तीय स्त्रोत इत्यादी विषयांवर महाविद्यालयातील पदव्युत्तर विभाग एम ए आणि एम कॉम तसेच सर्व शिक्षक, संशोधक यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी उपस्थित वर्गास मार्गदर्शन केले. आज संशोधन अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तम संशोधन कार्य करावे आणि देशातील तसेच परदेशातील संशोधनात्मक संधीचा फायदा घ्यावा. असे या प्रसंगी प्राचार्यांनी संबोधित केले. प्रा. इंदुरकर सर यांनी मत व्यक्त करताना सांगितले की अशा प्रकारचे मार्गदर्शन आम्ही महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ते सारखे ज्ञान मिळत नव्हते, परंतु आज विद्यार्थ्यांना उत्तम संधी आहेत. प्रस्तुत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शंका, प्रश्न विचारून उत्तम प्रकारे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना अमूल्य असा ज्ञानाचा खजिना या कार्यक्रमातून मिळाला. सदर ज्ञानाच्या विनियोग विद्यार्थी आपल्या पुढील प्रगतीसाठी करतील असे मत डॉ. पराग कारुळकर यांनी व्यक्त केले. सदर कार्यशाळेत सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीधर विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता डॉ. अरुण चव्हाण यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 1 0 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे