टेंभुर्णी हमालांची व्यापारी महासंघाकडे मागणी, हमालीचे दर वाढवावे

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10
टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील हमालांनी व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांना, एका निवेदनाद्वारे हमाली वाढवावी अशी मागणी केली आहे. महागाईच्या काळात जे दर आहे ते हमालाना परवडत नाही, त्यामुळे हे सद्यस्थितीचे दर वाढवून मिळावेत. सद्यस्थितीत अलपदर असल्यामुळे महागाईच्या काळात हे अल्प दर पुरत नाही. त्यामुळे आम्ही विनंती करीत आहोत की आम्ही पुढील प्रमाणे मागणीचे दर वाढवित आहोत ते वाढून मिळावे. त्याप्रमाणे आम्हाला खत सिमेंट भुसार कट्ट्याचे दर खालील प्रमाणे देण्यात यावे. प्रति टन 80 रुपये भाव असावा. आतील हमाली प्रतिष्ठान साठ रुपये असावी. सिमेंट व खत कोणी दहा रुपये प्रमाणे असावी. आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करावे. आमच्या मागणीचा सार्वतीपूर्वक विचार न झाल्यास आमच्यातर्फे बहिष्कार व आंदोलनाचे अस्त्र उभारल्या जाईल. यावर हमालांचे प्रमुख मुजाहिद शेख रफिक, व समाधान प्रल्हाद नाटेकर यांच्यासह अनेक आम्हालांच्या सह्या आहेत.



