pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना व बदनापुर तालुका जि.प.शिक्षक सह.पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री.सुभाष भडांगे यांची निवड.

0 4 6 0 7 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5

सविस्तर असे की, तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक पतसंस्थेचे संचालक श्री.सुभाष भडांगे यांची निवड करण्यात आली. दिनांक 5 जूलै 2026, रविवार रोजी सकाळी 11वाजता अध्यासी अधिकारी श्री.शरद तनपुरे (जिल्हा उपनिबंधक कार्यालय जालना) यांच्या उपस्थितीत वरील पदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न झाली. यावेळी शिक्षक उत्कर्ष पॅनलच्या वतीने श्री सुभाष भडांगे यांनी उमेदवारी दाखल केली होती. यात 10 विरुद्ध 5 अशा मतांनी त्यांचा विजय होऊन संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या निवडीबद्दल व्हाईस चेअरमन श्रीमती साधना गिऱ्हे(जैवाळ),खजिनदार श्री. अरुण जाधव, सचिव श्री. संतोष देशपांडे, संचालक सर्वश्री.रमेश हुशे,विकास पोथरे,जगत घुगे,जगन्नाथ शिंदे, सुभाष भडांगे, गणेश भुतेकर, दिनेश एखंडे, सचिन गंगावणे, रघुनाथ वाघमारे, देवेंद्र बारगजे, मधुकर काकडे, संचालिका श्रीमती वैशाली देशमुख तज्ञ संचालक श्री. बबनराव बोरुडे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी शिक्षक उत्कर्ष पॅनल चे प्रमुख श्री.मंगेश जैवाळ श्री. बाबासाहेब जुंबड, श्री. रमेश हुशे, श्रीमती सिमा काकडे यांनी अभिनंदन करताना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी श्री बाबुरावजी पवार श्री. अरुण जाधव, श्री. बबनराव बोरुडे,श्री.जगत घुगे, श्रीमती साधना जैवाळ व श्री.ईश्वर गाडेकर, श्री. प्रमोद पवार यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 7 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे