pub-7425537887339079

Year: 2026

  • ब्रेकिंग

    शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

    काजळा/प्रतिनिधी, दि.27   केंद्र काजळा अंतर्गत आज, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी जि.प. प्राथमिक शाळा, घोटण येथे शिक्षण परिषद उत्साहपूर्ण…

    Read More »
  • मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाइन कक्ष 

    जालना/प्रतिनिधी,दि.27 मराठा समाजातील नागरिकांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र हेल्पलाइन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाइन कक्षाच्या माध्यमातून मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, कागदपत्रे व पुराव्यांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. हेल्पलाइन कक्षासाठी नव्याने नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार (गृह) परमेश्वर शिंदे, तसेच महसूल सहाय्यक संदिप इंगळे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.. नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळविताना आवश्यक असलेल्या पुराव्यांची माहिती उपलब्ध करून देणे, अर्जाची प्रक्रिया समजावून सांगणे, उपलब्ध अभिलेखांमधून आवश्यक नोंदी शोधण्यास मदत करणे तसेच अर्जदारांच्या अडचणींचे योग्य प्रकारे निराकरण हेल्पलाइन कक्षामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये विशेषतः उपलब्ध अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा किंवा कुणबी जातीच्या नोंदी आढळल्यास त्याबाबत आवश्यक मार्गदर्शन नागरिकांना केले जाणार आहे. तसेच संबंधित नोंदी व पुराव्यांच्या आधारे पात्र नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत हेल्पलाइन कक्षात उपस्थित राहून, नागरिकांकडून कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करणे, उपलब्ध अभिलेखांची नोंद घेणे, आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे तसेच सेवे संबंधी बाबींमध्ये आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य करणार आहेत. तसेच हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या शंका व अडचणींचे योग्य प्रकारे निराकरण करून, आवश्यकतेनुसार संबंधित विभाग/अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याकरीता जिल्ह्यातील नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे घेऊन हेल्पलाइन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात माहिती, मार्गदर्शन अथवा अडचणींसाठी हेल्पलाइन क्रमांक ०२४८२-२२३१३२ वर संपर्क साधवा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.   ****

    Read More »
  • ब्रेकिंग

    २०२६ च्या पहिल्या सहामाहीच्या आढावा अहवालात जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीए २१व्या स्थानी.

    उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27 भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) अल्फालायनरच्या २०२६च्या पहिल्या सहामाहीतील (H1 २०२६) जगातील…

    Read More »
  • ब्रेकिंग

    महेंद्रशेठ घरत यांच्या मोठ्या मनाचा दिलदारपणा!

    उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27 आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांचे अनोखे दातृत्व‌ सर्वपरिचित आहे. दुसऱ्यांची…

    Read More »
  • ब्रेकिंग

    उरण तालुका बौद्धधम्म संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड

    उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27 उरण तालुक्यातील बौद्ध धर्मातील नागरिकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण करण्याबरोबरच धार्मिक व शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी उरण तालुक्यातील बौद्ध…

    Read More »
  • ब्रेकिंग

    उंचाडा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी ; मान्यवरांची मोठी उपस्थिती

    हदगाव/प्रतिनिधी,दि.26 उंचाडा येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उंचाडा येथे मोठ्या उत्साहात व अभिमानाने…

    Read More »
  • ब्रेकिंग

    टेंभुर्णीच्या विकासासाठी आलेला करोडो रुपयाच्या निधी गेला कुठे?

    जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26 ग्रामसभेसाठी तरुणांनी उपोषण करून उभी केलेली ग्रामसभेला मोठी गर्दी लाभली होती.येथील शुभम मुळे यांनी ग्रामसभा गावात घेण्यासाठी उपोषण…

    Read More »
  • ब्रेकिंग

    नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.

    उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25 नवीन शेवा व शेवा कोळीवाडा या दोन्ही विस्थापित गावांच्या प्रलंबित प्रश्नाला आता निर्णायक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली…

    Read More »
  • ब्रेकिंग

    उरण महाविद्यालयात ‘मासिक पाळीविषयक जनजागृती’ कार्यक्रम उत्साहात संपन्न.

    उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25 कोकण ज्ञानपीठ, उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (WDC) आणि श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता…

    Read More »
  • ब्रेकिंग

    “उरण महाविद्यालयात छायाचित्रण (फोटोग्राफी) अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाची सुरुवात”

    उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25 कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, उरण-रायगड येथे फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच Department of…

    Read More »
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे