बुलढाणा अर्बन शाखेत शाखा अधिकारी म्हणून वैभव कुलकर्णी रुजू. व्यापारी महासंघाच्या वतीने स्वागत.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11
टेंभुर्णी येथील बुलढाणा अर्बन पतसंस्था शाखा टेंभुर्णी येथे शाखा अधिकारी म्हणून वैभव कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे व्यापारी महासंघाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले. या वेळी संस्थाचे जेष्ठ संचालक देविदास देशमुख यांची त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.या वेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व बुलडाणा अर्बन बँकेचे संचालक अलकेश सोमाणी संचालक प्रदीप काबरा डॉ अविनाश सुरुशे धीरज काबरा श्रीकांत काबरा व्यापारी महासंघाचे उपाअध्यक्ष संजय बोडखे शिवराज सपाटे मनीष सोमाणी भगवान चव्हाण पांडुरंग बोरसे यांच्या कर्मचारी अनिल उखळकर, रोहित देशमुख, वैजिनाथ गिरी, नितीन देशमुख, गजानन सिनकर, संदीप चव्हाण, दीपक तेलंग्रे व अक्षय कुलथे यांची ही या वेळी उपस्थिती होती. वैभव कुलकर्णी हे या पतसंस्था मध्ये अगोदर राहून गेलेले होते त्यांची पुन्हा शाखा अधिकारी म्हणून निवडी बद्दल संस्थेच्या जवळपास 7000 खातेदार यांची समाधान व्यक्त केले.



