pub-7425537887339079
ब्रेकिंग

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

0 4 8 3 0 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.20

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला मुदतवाढ देत सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाच्या 15 जुलै 2026 रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्रात हा सुधारित कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी भेटी देण्याची मोहीम 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण 8 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार याद्यांचे प्रकाशन 17 ऑगस्ट 2026 मध्ये करण्यात येईल. मतदार यादीबाबत दावे व हरकती दाखल करण्यासाठी 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत करण्यात येईल. नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे दि. 17 ऑगस्ट, 2026 ते दि.15 ऑक्टोबर, 2026 त्यानंतर अंतिम मतदार याद्यांचे प्रकाशन 19 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. या सुधारित कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 14 मे 2026 आणि 15 जुलै 2026 रोजी दिलेल्या सर्व सूचनांचे संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे