pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना येथील मे. वसुधा अलॉयज प्रायव्हेट लिमीटेड प्रस्तावित प्रकल्प पर्यावरणविषयक जाहीर सुनावणीत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

0 4 0 4 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.4

मे. वसुधा अलॉयज प्रायव्हेट लिमीटेड गट नं.86 खादगाव ता.बदनापूर जि.जालना या प्रस्तावित विसतार प्रकल्पामध्ये टीएमटी बार 5000 टीएमटी ते 30,000 एमटीएम उत्पादन करणे व प्रसतावित नवीनएमएस बिलेटस 30,000 एमटीएम क्षमतेचे युनिट उभारणीबाबत पर्यावरण विषयक जाहिर लोकसुनावणी दि.21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता  आयोजित केली आहे. तरी या प्रकल्पाबाबत सुचना किंवा आक्षेप असल्यास सुनावणीच्या तारखेपूर्वी उपप्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्लॉट नं. पी-3/1 व पी-3/2 अतिरिक्त एमआयडीसी फेज-2 जालना येथे सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सो.म.कुरमूडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मे. वसुधा अलॉयज प्रायव्हेट लिमीटेड गट नं.86 खादगाव ता.बदनापूर जि.जालना या प्रस्तावित प्रकल्पामध्ये उत्पादन करणेबाबत पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी दि. 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11  वाजता मे. वसुधा अलॉयज प्रायव्हेट लिमीटेड गट नं.86 खादगाव ता.बदनापूर जि.जालना या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या  परिसरामधील रहिवासी, पर्यावरणविषयी काम करणाऱ्या संस्था, या प्रकल्पामुळे अन्य प्रकारे प्रभावित होणारे रहिवासी यांना या प्रकल्पासंबंधी विचार, टिका, टिप्पणी तोंडी किंवा लेखी स्वरुपात जाहीर सुनावणी दरम्यानसुध्दा नोंदविता येतील. या प्रकल्पाविषयी व पर्यावरण मुल्यांकन अहवालाच्या सारांशाची माहिती असलेले दस्तावेज जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र, महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय, तहसिल कार्यालय, तसेच जालना तालुक्यातील खादगाव व दावलवाडी ग्रामपंचायत कार्यालयात, औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय, मुंबई येथील सायन  पूर्व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात, मुंबई मंत्रालयातील पर्यावरण विभागात तसचे नागपूर येथील सिव्हील लाईन नवीन सचिवालय इमारतीतील पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयात संबंधित असणाऱ्या व्यक्ती कागदपत्रे कार्यालयीन वेळेत अभ्यासू शकतील. असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सो.म.कुरमूडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे