pub-7425537887339079
ब्रेकिंग

भाजपला महिला आरक्षणाच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजण्याची घाई! कॉंग्रेसच्या सोनललक्ष्मी घाग यांचे मत

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

 उरण/विठ्ठल ममताबादे,दि 22

“केंद्र सरकारने २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर केलेले असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्याऐवजी २०२६ मध्ये पुन्हा महिला आरक्षणाच्या आडून (डेलिमिटेशन) परिसीमन विधेयक संसदेत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून ही संविधान विरोधी कृती आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला स्वतःची पोळी भाजण्याची घाई झाली आहे. वास्तविक पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे; परंतु केंद्र सरकार तसे करत नाही. त्यामुळे भाजप सरकारची जनतेला दिशाभूल करण्याची ही खेळी आहे. हे केवळ महिला आरक्षण विधेयक नाही, तर देशाच्या लोकशाही ढाच्यात बदल करण्याचा प्रयत्न आहे. भारतीय संविधानावर आक्रमण करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करणाऱ्या विधेयकाला काँग्रेस पक्ष कधीही साथ देणार नाही, ते कायम हाणून पाडेल,” असे रत्नागिरी उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी बुधवारी (ता. २२) उलवे येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले. “काँग्रेसने नेहमीच महिलांना सत्तेत आणि पक्षातही प्राधान्य दिले आहे. सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी अशा असंख्य महिलांना काँग्रेसने संधी दिलेली आहे. थोडक्यात काँग्रेसने नेहमीच महिलांना सत्तेत आणि पक्षातही प्राधान्य दिले आहे,” असेही सोनललक्ष्मी घाग यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर उपस्थित होते. महिला आरक्षण विधेयकाची वस्तुस्थिती नेमकी काय आहे. केंद्र सरकार कशा पद्धतीने जनतेची फसवणूक करीत आहे. हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, अखलाख शिलोत्री, महिला जिल्हाध्यक्षा रेखा घरत, निर्मलाताई पाटील, विनया पाटील, सारिका पाटील, योगिता नाईक आदी महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे