
जगातील सर्वात कठीण आणि मोठी मानली जाणारी ८१ किमी भागीरथी नदी जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारे कैलास झोळगे हे देशातील मोजक्या खेळाडूंपैकी एक आहेत. भागीरथी नदीच्या प्रचंड प्रवाहात, रात्रंदिवस पाण्यात राहून, लाटांशी, थकव्याशी आणि थंडीशी झुंज देत हे अंतर कापणे म्हणजे केवळ खेळ नाही, तर मृत्यूवर मात करण्याची जिद्द आहे. अनेक जण १-२ किमी पोहून थकतात, तिथे ८१ किमीचा हा प्रवास म्हणजे हिमालय सर करण्यासारखाच आहे.
शाकाहारी जालन्याचे पहिले फुल आयर्नमॅन – मांसाहाराशिवायही अशक्य शक्य!
आज अनेकांना वाटते की ताकदीसाठी मांसाहार आवश्यक आहेत, पण कैलासजींनी हा गैरसमज खोटा ठरवला आहे. ते कट्टर शाकाहारी असूनही ‘फुल आयर्नमॅन’ आहेत. म्हणजेच एकाच दिवशी ३.८ किमी पोहणे + १८० किमी सायकलिंग + ४२.२ किमी मॅरेथॉन धावणे!असे एकूण226 की मी केवळ 15 तासात पूर्ण करून हा पराक्रम त्यांनी सिद्ध केले की, शुद्ध शाकाहारी आहार, डाळ-भात-भाकरी आणि सात्विक जेवणातही विश्वविक्रम करण्याची ताकद आहे.
तसेच६०० किमी सायकलिंग – फ्रान्सच्या BRM मध्ये भारताचा झेंडा!
फ्रान्सच्या Audax Club Parisien ने आयोजित केलेली जगातील सर्वात कठीण BRM सायकलिंग मालिका -किमी, ४०० ,३०० किमी आणि ६०० किमी चे टप्पे त्यांनी अविरतपणे करून त्यानं पोडियम फिनिशर्स ठरले केले आहेत. ६०० किमी म्हणजे जालना ते गोवा आणि परत! सलग 33 तास झोप न घेता, पायांना विश्रांती न देता सायकल चालवणे, हे फक्त पायांचे नाही तर मनाचेही बळ आहे. या कामगिरीमुळे त्यांना सुपर रँडोनियर हा आंतरराष्ट्रीय किताबही मिळाला आहे.
संघर्षातून यशाकडे – खरी प्रेरणादायी वाटचाल!
या यशामागे मोठा संघर्ष आहे. नोकरी, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पहाटे ४ वाजता उठून सराव, जालन्यात अद्ययावत सोयी नसताना केलेली तयारी, आर्थिक अडचणी आणि निवड चाचणीतील आव्हाने – या सगळ्यांवर त्यांनी त्यांच्या पत्नी, कुटुंबाच्या सहाय्याने मात केली. त्यांची अनमोल साथ हेच माझ्या यशाचे रहस्य असे झोळगे ह्यांनी नमूद केले.
अनेक खेळाडू, महिला आणि पुरुषांसाठी प्रेरणास्थान!
१. महिलांसाठी संदेश : “वय, संसार, जबाबदारी हे अडथळे नाहीत. रोज फक्त एक तास स्वतःसाठी काढा.”
२. पुरुषांसाठी संदेश : “व्यसन, मोबाईल आणि टेन्शन सोडा. फिटनेस नसेल तर पैसा, पद, प्रतिष्ठा सगळे व्यर्थ आहे.”
३. युवकांसाठी संदेश : “शॉर्टकटने यश मिळत नाही. सातत्य, शिस्त आणि मेहनत हाच खरा मार्ग आहे.”
फिटनेसचे महत्त्व – आजची गरज!
आज मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा यांसारखे आजार लहान वयातच जडत आहेत. अशा वेळी कैलासजी सांगतात, “औषधाच्या गोळ्यांपेक्षा घामाचा एक थेंब केव्हाही चांगला. रोज १ तास पोहणे, चालणे किंवा सायकलिंग करा. फिटनेस हीच तुमची खरी बँक बॅलन्स आहे.”
त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीमुळे जालन्यातील अनेकांनी आता पहाटे जलतरण तलावाची वाटû धरली आहे. त्यांच्या कार्यामुळे जालना जिल्हा “फिट जालना, हिट जालना” या मोहिमेतही आघाडीवर येत आहे.
या महान कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



