गो वत्स राधाकृष्ण महाराज यांची टेंभुर्णी येथे सदिच्छा भेट. टेंभुर्णी येथे एकदिवसीय भजन संध्या होणार.

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.10
महाराष्ट्र राज्यस्थान सह भारत भर ज्यांचे भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात आहे असे “विठ्ठल माझा माझा” या प्रसिद्ध गाण्याचे व सुंदर आवाजाचे धनी असलेले गो वत्स आदरणीय राधा कृष्ण महाराज यांची अहिल्यानगर येथील कथा संपल्यानंतर व पुढील सात दिवशीय संभाजीनगर येथील वेरूळ येथे कथा असल्याने विश्रांतीसाठी संध्याकाळी ठीक पाच वाजता टेंभुर्णी येथील त्यांचे गजेंद्र महाराज खोत यांच्या शेतात येऊन निसर्गमय वातावरणात एक दिवशीय विश्रांती केली.दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी येथील सुरू असलेल्या प्रभात फेरीच्या मंडळींना भेटून येथील माहिती घेतली,फेरी चांगली सुरू असल्याचे त्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी मोठा आनंद व्यक्त करून समाधान व्यक्त केले. तसेच येत्या नोव्हेंबर महिन्यात जालना जिल्हा येथे त्यांच्या सात दिवशीय कार्यक्रमादरम्यान एक दिवशी रात्री भजन संध्या ची तारीख टेंभुर्णीकरांना दिली असून लवकरच त्याची योग्य तारीख जाहीर करू अशा त्यांनी सांगितले. यावेळी शेतात गजेंद्र महाराज खोत व त्यांच्या सर्व परिवाराने महाराज जी यांचे चांगले आदरातिथ्य करून महाराज येथे आल्याचे समाधान व्यक्त करून समाधानाचा भाव व्यक्त केला.यावेळी त्यांच्या भक्त मंडळी पैकी भक्त अलकेश सोमानी, सुरज जांगिड,संजय बोडखे ,प्रदीप काबरा,शिवराज सपाटे ,अर्जुन कुमकर, अतुल बूजाडे, गजानन डोईफोडे,धीरज काबरा, नीरज जांगीड परमेश्वर उडानशु आदी मंडळी यांनी महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले महाराज येथून वेरूळ कथेसाठी ताबडतोब रवाना झाले.




