टेनिक्वाईट असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 30, 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2026 दरम्यान वसई, पालघर येथे राज्यस्तरीय सिनीयर टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनच्या वतीने दिनांक 13 ऑक्टोंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजल्यापासुन निवड चाचणीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे करण्यात आलेले आहे.
निवड चाचणीत सहभागी होण्याकरीता कोणतेही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी वयाचे बंधन नाही, सदर निवड चाचणीतुन जालना शहर जिल्हा करीता 6 मुले व 6 मुली व जालना ग्रामीण करीता 6 मुले व 6 मुली यांची निवड करण्यात येईल व हे खेळाडु राज्यस्तर स्पर्धेत जालना जिल्ह्याचे नेतृत्व करतील. टेनिक्वाईट हा खेळ शालेय स्पर्धांमध्ये सहभागी असुन दहावी व बारावीत असणार्या खेळाडुंना गे्रस गुणांसाठी पात्र आहे.
अधिक माहितीकरीता संघटनेचे शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366, अमोल काटकर, जिल्हा प्रशिक्षक उमेश खंदारकर, अमेाल सोलाट, नागेश वराडे, तुषार गर्जे, अमोल सातपुते, गोवर्धन वाहुळ, श्रीमती शेख महेजबीन, श्रीमती गिता संगम, श्रीमती करूणा निरेवाड, वेदांत सोरटी यांच्याशी संपर्क साधावा.
तरी या सुवर्ण संधीचा जालना जिल्हयातील खेळाडुंनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष जयंतराजे भोसले, देवगिरी विद्या प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बबन दादा सोरटी, जि.ई.एस. एज्युकेशनल कॅम्पसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पा. पुंगळे, नगरसेवक अश्विन अंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, क्रीडा अधिकारी श्रीमती लता लोंढे, श्रीमती आरती चिल्लारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम, आशीष जोगदंड, माजी नगरसेवक बाला परदेसी, ज्ञानेश्वर ढोबळे, प्रा. भुजंग डावकर, प्रा. चंद्रकांत लाटेकर, प्रा. गायत्री सोरटी, सुभाष पारे, श्रीमती सुनीता गवई, राजेश शेवाळे, गणेश भि. लांडगे, जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन जालना व जालना जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.