pub-7425537887339079
ब्रेकिंग

इस्लामविरोधी कथित वक्तव्यांचा आरोप नाझिया इलाही खान यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

0 4 7 9 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4

मुस्लिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाझिया इलाही खान यांच्या विरोधात सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून प्रेषित मोहम्मद पैगंबर, त्यांच्या कुटुंबीयांबाबत तसेच इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शुक्रवारी (३ जुलै) जाफ्राबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या काही व्हिडिओंमध्ये नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्म, प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह, अश्लील आणि दिशाभूल करणारी विधाने केली आहेत. या कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा तसेच सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदारांनी संबंधित व्हिडिओंची सखोल चौकशी करून माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जाफ्राबाद पोलिस प्रशासनाकडे केली आहे. यावेळी शेख नकीम, शेख कदीर, शेख नईम, शोहेब खान, शेख इरफान, शेख शकील, मोहम्मद अनवर, उबेद खान, मोहम्मद फैसल, नविद शेख यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे