pub-7425537887339079
ब्रेकिंग

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कै. बाबुराव जाफ्राबादकर विद्यालयाचे यश!

संध्या पांगारकर व नंदिनी शहाणे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार!

0 5 3 1 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.17

सायन्स हॉबी सेंटर, जालना यांच्या वतीने संजय टिकरिया यांनी आयोजित केली होती.राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत हिंदू समाज संस्था संचलित कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.

विज्ञान शिक्षण आणि मी’ हा स्पर्धेचा विषय होता. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.  त्यामध्ये मुंबई, पुणे सोलापूर,हिंगोली, नांदेड, जिंतूर, बीड अशा विविध जिल्ह्याचा समावेश होता. या स्पर्धेत कै.बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयातील संध्या  पांगारकर व नंदिनी शहाणे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थिनींनी स्वतःच्या विचारशक्तीचा व कल्पकतेचा प्रभावी वापर करून, सुंदर हस्ताक्षरात व आशयपूर्ण पद्धतीने निबंध सादर केला. त्यांच्या उत्कृष्ट लेखनाची दखल घेत त्यांना कलाईडस्कोप,प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.सायन्स हॉबी सेंटरच्या वतीने विद्यार्थिनींना **संजय टीकारीया **यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विद्यालयात सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.मीनाक्षी कुलकर्णी व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक उपक्रमशील शिक्षक संदीप इंगोले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल हिंदू समाज संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजीव देशपांडे, उपाध्यक्ष जगदीश बडवे, भगवान धोत्रे, सचिव चंद्रशेखर वाघमारे, संचालक डॉ. विनायक दसरे, कुमारजी देशपांडे, नितीन कोळेश्वर, जुगलकिशोर भक्कड, रावसाहेब अवघड व अरुण किनगावकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व साहित्यिक उपक्रमांना निश्चितच नवी प्रेरणा मिळाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 1 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे