अखिल भारतीय माळी महासंघाच्या tebhurni शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील
अखिल भारतीय माळी महासंघाच्या ग्राम शाखेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. ग्राम शाखेच्या अध्यक्षपदी सोमनाथ ताबेकर, सचिवपदी प्रकाश मुळे तर सहसचिवपदी शिवाजी जमधडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विठ्ठल माऊली पोरहीत, पत्रकार सुनिल भाले पवन पाचे भगवान घोडके प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला.


