pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या आळंद परिसरात बिबट्याची दहशत; वन विभागाने लावला पिंजरा

0 4 4 9 7 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

जाफराबाद तालुक्यातील आळंद, कुंभारझरी व ब्रम्हपुरी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. अनेक शेतकऱ्यांना बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याचे सांगितले जात असून, कुंभारझरी परिसरात सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला करून बिबट्याने तिला ठार केल्याची घटना घडली होती. दरम्यान, ७ जूनच्या रात्री आळंद शिवारात बिबट्याने एका गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आळंदचे सरपंच राजीव गायकवाड यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानुसार वन विभागाने तत्परता दाखवत आज सकाळीच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. पिंजरा लावण्यासाठी वन विभागाचे अधिकारी सकाळी सुमारे ११ वाजता गावात दाखल झाले. यामध्ये वन परिमंडळ अधिकारी डोमळे साहेब (भोकरदन), वनरक्षक हटकर साहेब, वनरक्षक वरशीळ साहेब तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे