pub-7425537887339079
ब्रेकिंग

नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या : पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफ्राबाद /दत्ता देशमुख,दि.29

डिजिटल व्यवहारांची वाढ होत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना विशेष दक्षता घेणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन टे्भूर्णी येथील पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांनी केले आहे.

खार्डे यांनी सांगितले की, अनेक फसवे लोक बँक अधिकारी, कंपनी प्रतिनिधी किंवा सरकारी कर्मचारी असल्याचे भासवून नागरिकांकडून OTP, ATM पिन, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती मिळवतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अशी माहिती कोणालाही देऊ नये. बँक किंवा अधिकृत संस्था कधीही फोनवरून अशी माहिती विचारत नाहीत, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

तसेच, मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक, ई-मेल किंवा मेसेजवर क्लिक करताना सावधगिरी बाळगावी. अनेकदा बनावट वेबसाईट किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून खात्यातील पैसे चोरीला जातात. त्यामुळे व्यवहार करताना केवळ अधिकृत आणि सुरक्षित वेबसाईटच वापरणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावर येणाऱ्या आकर्षक ऑफर्स, लॉटरी किंवा बक्षिसांच्या आमिषाला बळी पडू नये. अशा प्रकारच्या संदेशांमागे फसवणूक असण्याची शक्यता जास्त असते. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा सायबर क्राईम हेल्पलाईनवर तक्रार करावी.

नागरिकांनी स्वतः जागरूक राहून कुटुंबीय आणि मित्रांनाही याबाबत माहिती द्यावी. थोडीशी सतर्कता आणि योग्य माहितीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानापासून बचाव होऊ शकतो, असेही खार्डे यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे