मधुबन कॉलनी, जुना जालना पोस्ट ऑफिस येथील आगीची घटना
तत्परतेमुळे मधुबन कॉलनीतील भीषण आग आटोक्यात, मोठी दुर्घटना टळली

जालना/प्रतिनिधी, दि.11
जालना: मधुवन कॉलनी, जुना जालना पोस्ट ऑफिस परिसरात एका अज्ञात व्यक्तीने सुकलेल्या झाडांना आग लावली. सदर ठिकाणाच्या शेजारीच जिल्हा महिला रुग्णालय व पोस्ट ऑफिस असून दोन्ही ठिकाणी मोठे ट्रान्सफॉर्मर व जनरेटर आहेत. आग भडकल्यास रुग्णालय व पोस्ट ऑफिसला धोका निर्माण झाला असता.
ही बाब लक्षात येताच सिव्हिल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. गवारे, डॉ. डॉ.सच्चिदानंद तौर सुरक्षा कर्मचारी अनंत कारडे , तसेच जागरूक नागरिक अनंता मदन व विनायक सुपेकर यांनी तात्काळ महिला बालकल्याण समिती सभापती सौ. संध्या संजय देठे यांना फोन द्वारे कळविले.
सभापती सौ. देठे यांनी क्षणाचाही विलंब न करता फायर ब्रिगेडचे अधिकारी श्री गजानन काळे व त्यांच्या संपूर्ण टीमला पाचारण केले. फायर ब्रिगेडच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली व संभाव्य मोठी हानी टळली.
या तत्पर कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी फायर ब्रिगेड टीम, व सौ देठे यांचे आभार मानले



