माझी माती, माझा देश उपक्रमातंर्गत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण
जालना/प्रतिनिधी,दि. 14
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने माझी माती, माझा देश या उपक्रमातंर्गत आज मौजे देवमुर्ती ता. जालना येथे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या परिसरात शिलाफलकाचे अनावरण व वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी पंचप्रण शपथ घेतली.
कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) एस. व्ही. कराड, गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी, देवमुर्तीच्या सरपंच श्रीमती कदमताई आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी शिलाफलक स्थापित करणे, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन व पंचप्रण शपथ हे उपक्रम एकाच दिवशी आज दि. 14 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाभरात राबविण्याबाबत नियोजन केले होते, त्यानुसार आज शिलाफलक स्थापित करणे, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन व पंचप्रण शपथ हे उपक्रम जिल्हाभरात एकाच दिवशी 778 ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात आले.



