pub-7425537887339079
ब्रेकिंग

युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया व वनविभाग यांचं रेस्क्यू ऑपरेशन मध्ये नीलगाईचा जीव वाचला

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.8

भीवगाव शेतात एका विहिरीतील पाण्यात अडकलेल्या नीलगायीचे अखेर यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. सदरील घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाची टीम तसेच युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया ची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया तर्फे ॲनिमल रेस्क्यू हेड वैभव लाखोले यांनी रेस्क्यू मोहिमेत सहभाग घेतला. विहिरीत पाणी असल्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत धोकादायक व आव्हानात्मक ठरत होते. सुरुवातीला नीलगायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना दोरी तुटल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. तसेच रात्र झाल्याने ऑपरेशन तात्पुरते थांबवण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा वनविभाग व युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया यांच्या संयुक्त टीमने रेस्क्यू मोहीम सुरू केली. परिस्थिती गंभीर असल्याने वैभव लाखोले स्वतः विहिरीत उतरले. वनविभागातील एका कर्मचाऱ्यासह त्यांनी नीलगायीला शांतपणे नियंत्रणात घेत तिच्या कंबरेला दोरी बांधली. त्यानंतर सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून नीलगायीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. या यशस्वी रेस्क्यूमुळे एका वन्यजीवाचा जीव वाचला असून परिसरातील नागरिकांनी वनविभाग व युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे