pub-7425537887339079
ब्रेकिंग

सेझच्या जमिनी बाबत लवकरात लवकर तोडगा काढणार – महसुल मंत्री बावनकुळे.

0 4 6 0 6 8
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

सेझच्या जमिनी बाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात येणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.दिनांक १०/६/२०२६ रोजी मंत्रालय मुंबई येथे रायगड जिल्हयातील पेण, उरण, पनवेल तालुक्यामधील एस.ई.झेड. प्रकल्पामुळे प्रभावीत शेतकऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नाबाबत महसुलमंत्री बावन कुळे यांच्या चेंबरमधे बैठक घेण्यात आली. सदरचे वेळी कंपनीचे नावे असलेल्या व कीत्तेक वर्षे न वापरलेल्या जमिन मिळकती सरकारने ताब्यात घेता येतील का ? या विषयी वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्यावेळी शेतकऱ्यांची बाजु ऍड. दत्तात्रेय नवाळे यांनी यशस्वीपणे मांडली. सदरचे वेळी पेण तालुक्याचे आमदार रवीशेठ पाटील तसेच संबंधीत विभागाचे अधिकारी होते. त्यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनीधी म्हणुन शेतकरी संघाचे अध्यक्ष हेंमत म्हात्रे तसेच शेतकरी मुरलीधर म्हात्रे, राम ठाकुर, रोहन भोईर, वसंत थवई, बाळकृष्ण माळी, गजानन म्हात्रे,सुभाष पाटील, पेण-दादर गावचे शेतकरी विजय पाटील तसेच नाईक हजर होते. त्यावेळी सेझच्या प्रश्नाचा लवकरात लवकर निपटारा करण्याबाबत आवश्यक त्या सुचना मंत्री महोदयांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे