नवरात्र उत्सवानिमित्त डावरगाव देवी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 11
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या डावरगाव देवी येथील जागृत देवस्थान असलेले जगदंबा मातेचे ठिकाण पंचक्रोशीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील भाविक भक्तांसाठी जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले मा जगदंबेचे जागृत ठिकाण आहे या देवस्थानाला येणाऱ्या भाविक भक्तांचे नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेला मोठी रेलचेल असती या काळात गावकऱ्यांच्या वतीने व संस्थांच्या वतीने व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने मोठ्या कार्यक्रमाचे जगदंबेच्या जागरणाचे प्रबोधनात्मक कार्यक्रमाची रेलचल असते सालाबादप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे व धार्मिक कार्यक्रम असून मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा होत आहे उत्सवातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे सकाळी चार ते सहा काकड आरती भजन सहा ते सात विष्णू सहस्त्रनाम दुपारी एक ते चार देवी भागवत सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा ते सात दांडिया खेळ सात ते साडेसात महाआरती रात्री साडेआठ ते साडेदहा हरिकीर्तन व नंतर जागरण असा दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे देवी भागवताचार्य हरिभक्त परायण प्रकाश महाराज देशपांडे डावरगाव देवी यांच्या सुमधुरवाणीतून आपल्याला देवी भागवताचे श्रवण करण्याचा योग आला असून काल्याचे किर्तन दिनांक ११/१०/२०२६ते २०/१०/२०२६ या कालावधीत होत असून काल्याचे किर्तन दिनांक 20 10 2026 सकाळी आठ ते दहा या वेळेत शीतल संत परमपूज्य स्वामी महेश गिरीजी बाबा श्री गौरीशंकर आश्रम श्री शेत्र गोंधनखेडा यांचे होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या जागृत देवस्थानाला भेट देऊन नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यावा गावकऱ्यांच्या प्रयत्नातून व पंचक्रोशीतील भक्तजनांच्या सहकार्यातून जगदंबा मातेच्या डबल मजली मंदिराचे काम प्रगतीपथावर असून येणाऱ्या भाविक भक्तांचे श्रीक्षेत्र डावरगाव देवी येथे गावकऱ्यांच्या वतीने संस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे


