pub-7425537887339079
ब्रेकिंग

शेख मोहसीन मजीत हत्या प्रकरणात, आरोपींना फाशीची शिक्षा द्या, जाफराबादेत नागरिकांचा मोर्चा

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13

जाफराबाद येथील येथील मिरची व्यापारी शेख मोहसीन मजीद यांच्या निघृण हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. त्यामुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. डॉ. फयेज चौकातून मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तहसीलदार लोंढे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यातआले. निवेदनात म्हटले आहे की, शेख मोहसीन मजीद हत्या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, मोर्चात होता यांचा सहभाग या मोर्चात अॅड. विनोद श्रीराम डिगे, नगराध्यक्ष दीपक पाटील वाकडे, उपनगराध्यक्ष रऊफ चेअरमन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामधन पाटील कळंबे, नगरसेवक सुरेश दिवटे, नगरसेवक अनिल बोर्डे, तालेब, मुजिब, मोईन खान पठाण, शेख अश्पाक, अॅड. सादिक अलीम, हाफिज शेख जहूर, शेख इरफान, शेख रिजवान, सुरेश गवळी, अमोल पडघन, सलमान पठाण, रशीद कुरेशी, शेख हुजेर, शेख इस्माईल, नजीर खान यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाच्या माध्यमातून जाफराबादकरांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी प्रशासनाकडे केली. खटला जलदगती न्यायालयात चालवावा, तपास जालना स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा तसेच पीडित पक्षासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय शहरात पोलीस गस्त वाढविणे व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे