गुणवंत विद्यार्थी हे महाविद्यालयाची संपत्ती आहे- —प्राचार्य डॉ.राहुलजी म्हस्के

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.6
सिद्धार्थ महाविद्यालयात बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जाफराबाद प्रतिनिधी दिनांक 5/ 5/ 2026 येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2026 मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुलजी म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रो.डॉक्टर सुनील मेढे उपप्राचार्य डॉ.शाम सर्जे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातून कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2026 मध्ये सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 78.11% लागला असून परीक्षेसाठी एकूण 269 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 207 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये कला शाखेचा निकाल 61.16% लागला असून प्रथम क्रमांकाने कुमारी रजनी मिलिंद चव्हाण 79.83% द्वितीय क्रमांक आदित्य पंडित साळवे 71.33% तृतीय क्रमांक कु.साक्षी संतोष साबळे 65.50% तर वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 77.35% लागला असून प्रथम क्रमांकाने कार्तिक रामेश्वर इनामे 94% द्वितीय क्रमांक अनस शरीफ शेख 80.50% तृतीय क्रमांक गणेश साहेबराव तिखे 73% तर विज्ञान शाखेचा एकूण निकाल 94.49 टक्के लागला असून प्रथम क्रमांकाने कुमारी श्रुती गजानन पाटील 70.83% कु.वैभवी अनिल सरकटे ,70.83% द्वितीय क्रमांक आशिष रवी हिवाळे 68.33% तृतीय क्रमांक श्रुती रवींद्र चौधरी 65.50% या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा.डॉ.राहुलजी म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी डॉ.राहुलजी म्हस्के यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.राहुलजी म्हस्के म्हणाले की, गुणवंत विद्यार्थी हे महाविद्यालयाची संपत्ती असून भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात असलेल्या उच्चशिक्षित अनुभवी प्राध्यापक वर्ग,ग्रंथालय,प्रयोगशाळा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,समुपदेशन केंद्र,व्यवसाय मार्गदर्शन केंद्र,ई- लायब्ररी इत्यादी विभागाचा मोठ्या प्रमाणात वापर करून आपली गुणवत्ता वाढवून तालुक्याबरोबर महाविद्यालयाचेही नावलौकिक वाढवावे असे त्यांनी सांगितले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दादासाहेब म्हस्के,प्राचार्य डॉ.सविता सिनगारे,वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे,डॉ.श्याम सर्जे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.विनोद हिवराळे,प्रबंधक श्री सुनील भाऊ म्हस्के,कार्यालयीन अधीक्षक श्री प्रकाश मिरगे व तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुरेश पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.उत्तम वाघ यांनी केले.कार्यक्रमास कनिष्ठ विभागातील प्रा.वसुदेव म्हस्के, प्रा.सिद्धार्थ पैठणे,प्रा.भगवान गाढवे, प्रा.संदीप पंडित, प्रा.जितेंद्र वाघ, प्रा.भालचंद्र येवले, प्रा.प्रमोद राजपूत, प्रा.वाहेद पटेल, प्रा.शिवाजी वैद्य, प्रा.श्रीकृष्ण खरात, प्रा.निवृत्ती बनसोडे, तसेच वरिष्ठ विभागातील प्रा.अनिल वैद्य, प्रा.डॉ.विजय पाटील, प्रा.डॉ.संतोष पहारे, प्रा.डॉ.पंडित गडकरी, प्रा.डॉ.मदन मगरे, प्रा.बी.बी.चव्हाण, प्रा.डॉ.मोठा भाऊ मोरे यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक,विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली.




