pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभूर्णी येथे पवार परिवाराची १५४ वर्षांची परंपरागत ‘केळीच्या पानांची गौरी’ स्थापित; पाचव्या पिढीकडून वारसा कायम.

0 4 8 9 8 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18

टेंभूर्णी (ता. जाफ्राबाद):नवसाला पावणारी आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारी टेंभूर्णी येथील पवार परिवाराची परंपरागत ‘केळीच्या पानांची गौरी’ या वर्षीही अत्यंत भक्तीमय वातावरणात स्थापित करण्यात आली आहे. जाफ्राबाद तालुक्यातील शिक्षक श्री. प्रमोद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुमारे १५४ वर्षांची ही अनोखी आणि ऐतिहासिक कौटुंबिक परंपरा या वर्षीही मोठ्या उत्साहात कायम ठेवली आहे.स्वप्नातील साक्षात्काराने झाली होती सुरुवातया अनोख्या परंपरेची सुरुवात पवार परिवाराचे पूर्वज स्व. भिमाजी लक्ष्मणराव पवार यांनी जाफ्राबाद तालुक्यातील डोलखेडा येथून केली होती. त्या काळी स्व. भिमाजीराव पवार यांना स्वप्नात महालक्ष्मीचा दृष्टांत (साक्षात्कार) झाला होता. “तुम्ही दरवर्षी जुन्या (धातूच्या किंवा मातीच्या) गौरी स्थापन करता, परंतु वर्षभर तिचे घरामध्ये योग्य ते पावित्र्य राखले जात नाही. त्यामुळे यापुढे तुम्ही आपल्या शेतातील केळीच्या पानांपासून गौरी तयार करावी, तिचे दरवर्षी विसर्जन करावे आणि गौरीसाठीचा नैवेद्य हा अगदी साधा व सात्विक असावा,” असा आदेश त्यांना मिळाला होता.पाचव्या पिढीकडून परंपरेचे जतनहाच आध्यात्मिक वारसा शिरसावंध्य मानून पवार परिवाराने केळीच्या पानांची गौरी बसवण्यास सुरुवात केली. आजच्या आधुनिक काळातही पवार परिवाराची ही पाचवी पिढी तितक्याच श्रद्धेने आणि पवित्रतेने ही परंपरा पुढे चालवत आहे. निसर्गाशी जोडलेली आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक असलेली ही गौराई संपूर्ण परिसरात ‘नवसाला पावणारी गौरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी या वैशिष्ट्यपूर्ण केळीच्या पानांच्या गौरीचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक पवार यांच्या निवासस्थानी हजेरी लावतात. अतिशय आकर्षक सजावट आणि पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जात असून, या निमित्ताने पवार परिवाराने जपलेला हा सांस्कृतिक वारसा कौतुकाचा विषय ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 9 8 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे