pub-7425537887339079
ब्रेकिंग

वै.श्रीधर उर्फ बाळू पांचाळ यांच्या कुटुंबीयास आम्ही वारकरी परिवाराचा मदतीचा हात

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रतिनिधी, दि 23

आज दिनांक २३.०६.२०२६ रोजी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी मंडळींनी वै.श्रीधर उर्फ बाळू पांचाळ यांच्या कुटुंबीयास घुंगराळा येथे जाऊन सांत्वन पर भेट घेतली. वै.बाळू पांचाळ यांचे २९.०५.२०२६ रोजी आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीच्या समयी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयास २१०००₹ एकवीस हजार रुपये देणगी देण्याचे संस्थेकडून बोलण्यात आले होते.त्यानुसार आज घुंगराळा येथे जाऊन बाळू पांचाळ यांचे वडील श्री गोपीनाथ पांचाळ यांच्या नावे संस्थेकडून चेक देण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर,सचिव हभप व्यंकटराव महाराज माळकौठेकर,संस्थेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष हभप जगन्नाथ चक्रवार सावकार,सल्लागार हभप शिवाजी पांगरेकर, कोषाध्यक्ष हभप शिवाजी मदमवाड,राज्य प्रसिद्धी प्रमुख हभप चंपतराव डाकोरे, सदस्य बंडू पा.कदम,मुखेड तालुकाध्यक्ष हभप मारोती वडजे,नायगाव तालुका उपाध्यक्ष हभप शंकर आकले उपस्थित होते. आम्ही वारकरी परिवाराने केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे