pub-7425537887339079
ब्रेकिंग

प्राचार्य डाॅ. विठ्ठल मोरे जीवनगौरव पुरस्काराने पी. एस. घाडगे सन्मानित!

0 4 2 5 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16

मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तथा राज्यातील शिक्षक चळवळीचे नेते पी.एस. घाडगे यांना ‘प्राचार्य डाॅ. विठ्ठल मोरे जीवनगौरव-2026’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, प्राचार्य डाॅक्टर विठ्ठल मोरे समाज विज्ञान फौंडेशन तर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यास ‘प्राचार्य डाॅ. विठ्ठल मोरे जीवनगौरव’ पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष पी. एस. घाडगे यांना देण्यात आला. मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी प्राचार्य डाॅक्टर विठ्ठल मोरे याच्या स्मृतिदिनी शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी येथे प्राचार्य कुसुमताई मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शानदार कार्यक्रमात, महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक कवी व लेखक इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते पी. एस. घाडगे यांना प्राचार्य विठ्ठल मोरे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्रात म्हटले आहे की “आपण शैक्षणिक व सामाजिक चळवळीमधे सातत्याने सक्रिय राहून समाज घडविण्याचे महान कार्य केले आहे. शिक्षक चळवळीचे नेतृत्व करत असताना आपल्या ठाम विचारांनी, जिद्दीने आणि कार्यकर्त्यांच्या तळमळीने आपण अनेक शिक्षकांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले. आपले संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन आणि शैक्षणिक सुधारणा यासाठी समर्पित राहिले आहे. आपल्या कार्यातून समाज जागृती, प्रबोधन आणि सकारात्मक बदल घडत राहिले…हीच आपल्या जीवनकार्याची खरी ओळख आहे. आपल्या या प्रेरणादायी, नि:स्वार्थ आणि दैदिप्यमान कार्याची दखल घेऊन आपणांस ‘प्राचार्य डाॅक्टर विठ्ठल मोरे जीवनगौरव पुरस्कार-2026’ प्रदान करून आम्ही सन्मानित करीत आहोत, याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. आपले मार्गदर्शन असेच समाजाला लाभत राहो, आणि आपल्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीस मिळत राहो ही सदिच्छा!” प्राचार्य डाॅक्टर विठ्ठल मोरे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा शिक्षक संघाचे माजी सरचिटणीस व्ही.जी.पवार, अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम,उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, गुट्टे एस.जी.*कोषाध्यक्ष* औताडे ए.बी.,सहसचिव पवार टी.जी.,माळी एन.जी.,श्रीमती रेखा साळुंखे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव, अशोक मस्कले, मधुकर जोंधळे, रातोळे जी.जी.,कुरेशी ए.ए.,राठोड पी.आर.,सुर्यवंशी आर.एन.,कदम व्ही.जी.,कौशल्य जी.पी.,पाटोदेकर ए.डी.,सोळंके एन.टी.,वऱ्हाड बी.ए.,तिर्थकर एस.एस.,जमादार एफ.बी.,पाटील पी.एस.यांच्यासह जिल्हाध्यक्ष कालीदास धपाटे, व्यंकटराव चिलवरवार, बसवेश्वर माने,शेरखाने जे.एस.,रमेश आंधळे, यशवंत मकरंद, हरिभाऊ भडके, हाळदे के.एम. जिल्हासचिव गणेश आजबे, रविंद्र वाकोडे, भाई चंद्रकांत चव्हाण, माने जी.व्ही.,विक्रम मायाचारी,संजय यळवंते, कदम एन.टी.,ढेंगळे व्ही.एस.,दिनेश पाटील, बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा मार्गदर्शक डी.जी.तांदळे, लोकमान्य नागरी सहकारी पतस्थेंचे मुख्या कार्यकारी अधिकारी नितीन वायचळे, शाखाधिकारी चंद्रशेखर सरकटे व लोकमान्य परिवारातील पदिधिकारी व कर्मचाऱ्यांनी पी.एस. घाडगे यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे