pub-7425537887339079
ब्रेकिंग

सुरेश ठाकूर यांचे निधन

0 5 3 2 7 3
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5
उरण नगरपरिषदेचे नगरसेवक अतुल ठाकूर यांचे वडील, नगरसेवक राजू ठाकूर यांचे काका तसेच उरणमधील सुप्रसिद्ध वॉटर सप्लायर सुरेश पांडुरंग ठाकूर यांचे बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे  त्यांच्या निधनाची वार्ता समजताच उरण शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक व नागरिकांनी ठाकूर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
उरणच्या सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात त्यांचा परिचय होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर येथे होणार आहे. उत्तरकार्य शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी अयोध्या इमारत, पालवी हॉस्पिटलजवळ, उरण शहर येथे होणार आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 2 7 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे