pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिजाऊ शैक्षणिक संकुल टेंभुर्णी येथे संजयजी लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न; तब्बल ६११ रुग्णांची तपासणी

0 5 3 2 0 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

जिजामाता ग्रामीण विकास मित्र मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष श्री. संजयजी लहाने सर यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ शैक्षणिक संकुल टेंभुर्णी येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक संस्थापक अध्यक्ष मा. संजय लहाने सर उपस्थित होते तसेच आदर्श शिक्षक शेख जमीर सर , विनोदजी बकाल, शेख अशपाक, लोणकर. डॉ. जागृती गुल्हाने, डॉ.गणेश नायडू प्रथमेश पांचाळ गायत्री तिडके अभिजीत इंगळे प्रकाश वावळ किशोर शेजुळ,प्राचार्य संजय फलटणकर
प्राचार्य पंजाब लहाने
प्राचार्य गजानन वायाळ
प्राचार्य मुजाहिद पठाण यांची उपस्थिती होती.

​कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना जमीर सर यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी संजयजी लहाने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अशा आरोग्यदायी आणि सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले तसेच अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा आधार मिळतो, असे प्रतिपादन केले.

या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाचा लाभ घेतला.
शिबिराची ठळक वैशिष्ट्ये:

भव्य प्रतिसाद: शिबिरामध्ये एकूण तब्बल ६११ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.
विशेष सहकार्य: श्री गणपती नेत्रालय जालना व जिजाऊ ग्रामीण विकास मित्र मंडळ (जाफराबाद-भोकरदन) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले गेले होते.
सवलती व मोफत लाभ: पिवळे राशनकार्ड धारकांसाठी मोफत शस्त्रक्रिया, तर केशेरी राशनकार्ड धारकांसाठी सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेची सोय करण्यात आली.
या सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रमामुळे संजयजी लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय फलटणकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंजाब लहाने यांनी केले नेत्र तपासणी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक संकुल टेंभुर्णी येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 2 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे