pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

टेंभुर्णीच्या शिवाजी चौकात वाहतूककोंडी,, जिनींग फाट्यावर वाहनांचा बेसिस्त वेग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष

0 4 0 9 1 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.11

जाफराबाद-जालना महामार्गावरील टेंभुर्णी येथील शिवाजी चौकात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. बसस्थानक परिसरात वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडत असून, स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

टेंभुर्णी हे जाफराबाद-जालना महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ

असते. मात्र, शिवाजी चौकातील बस थांब्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला आणि मधोमध उभी केली जात असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. हायवेवर चहूबाजूंनी वाहनांचा गराडा पडत असल्याने वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मुख्य रस्त्यावरील हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदारांनी ग्राहकांच्या गाड्या आपल्या दुकानासमोर रस्त्यावर उभ्या करू देऊ नयेत, अशी अपेक्षा आहे. मात्र,

काही वाहनचालक मुख्य रोडवरच गाड्या पार्क करून निघून जात असल्याने कोंडीत भर पडत आहे. या अव्यवस्थेचा सर्वाधिक त्रास महिला प्रवाशांना आणि जेष्ठांना सहन करावा लागत आहे.

“वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करावी आणि वाहतुकीला शिस्त लावावी,” अशी मागणी त्रस्त प्रवाशांनी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी लक्ष द्यावे
आपेक्षा
—————————————————————–
बेशिस्त पार्किंगः बस थांब्याजवळ जास्त वेळ उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करा.
—————————————————————
व्यावसायिकांची. जबाबदारीः दुकानदारांनी ग्राहकांना दुकानासमोर रस्त्यावर वाहने लावण्यास मज्जाव करावा.
—————————————————————-
महिलांची सुरक्षाः गर्दीमुळे महिला प्रवाशांना होणारा त्रास थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना हवी.

आता तरी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे,. सार्वजनिक बांधकाम विभाग, हा रस्ता ज्यांच्या हत्यारित येतो त्यांनी लक्ष देण्याची गरज, टेंभुर्णीच्या स्थानिक पुढऱ्याचे तसेच प्रस्थापित पुढऱ्यांचे यांची जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 1 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे