स्वप्नील शिनगारे यांची उत्तुंग भरारी

बदनापूर/प्रतिनिधी, दि.8
आदर्श विद्यालय सायगाव, (डों) येथील विद्यार्थ्याने यशाचा नवा टप्पा गाठत शाळेचा व गावाचा मान उंचावला आहे. स्वप्निल लक्ष्मण शिनगारे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत कर सहाय्यक (Tax Assistant) पदावर नियुक्ती झाली आहे.
स्वप्निल शिनगारे यांनी अत्यंत मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. ग्रामीण भागातून शिक्षण घेत असताना अनेक अडचणींवर मात करून त्यांनी हे स्वप्न साकार केले आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच गावकऱ्यांनी स्वप्निल यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या यशामुळे आदर्श विद्यालय सायगाव, (डों) या शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वप्निल शिनगारे यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरणारे असून त्यांनी मेहनत आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे सिद्ध केले आहे.




