pub-7425537887339079
ब्रेकिंग

बेकायदा ट्रेलर पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जनतेतून मागणी.

0 4 4 9 7 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.11

गव्हाण फाटा-दिघोडे मार्गावर तसेच उरण पनवेल मुख्य रस्त्यावर जासई बस स्टॅन्ड येथे तसेच करळ फाटा येथे दोन्ही बाजूला पार्किंग करून ठेवलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर वाहनांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, बस, रिक्षा, मोटार सायकलस्वरांचा अपघात होण्याचा धोका मोठया बळावला आहे.यातून अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे अशा बेकायदेशीर व अनधिकृत पणे उभे असलेल्या सर्वच वाहणावर कायदेशीर कारवाई करून या समस्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी जनतेने केली आहे. गव्हाण फाटा-दिघोडे मार्गावर तसेच उरण पनवेल मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी, या मार्गावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम खात्याने काही वर्षांपूर्वी गव्हाण फाटा-दिघोडे मार्ग हा चौपदरी करण्यात आला होता. मात्र, काही गोदाम मालकांनी येथे चक्क अनधिकृतपणे ट्रेलर उभे करण्यास सुरुवात केली. अशात रस्ता अरुंद होत असून, इतर गाड्यांना प्रवास करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.याचा त्रास वयोवृद्ध व शाळकरी मुलांनीही अनेकदा होतो. यावर तोगडा काढावा यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व पोलिस प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.वारंवार होणाऱ्या अनधिकृत व बेकायदेशीर पार्किंग मुळे उरण मधील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रोजचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ही दैनंदिन समस्या आता उग्र रुप धारण करत आहे. कोट (चौकट ):- रस्ते वाहतूक व अपघात तसेच वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग संदर्भात आम्ही जेएनपीएच्या चेअरमनसोबत बैठक घेतली आहे. यार्डमध्ये ५० कंटेनरची जागा असते, तर येथे २५० कंटेनर येतात. त्यामुळे अनेक कंटेनर हे रस्त्याच्या आडवे लावले जातात. याबाबत आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो. वाहतूक कोंडी होऊ नये तसेच अपघात होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत – अतुल दहिफळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरण वाहतुक विभाग,

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे