pub-7425537887339079
ब्रेकिंग

संग्राम तोगरे आदिवासी वाडीला आनंद देणारा एक मोठ्या मनाचा माणूस ! – साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7

समाज सेवेचे व्रत अंगी घेतलेले कवी संग्राम तोगरे हे मागील कित्येक वर्षांपासून विविध ठिकाणच्या डॉक्टरांकडे शिल्लक राहिलेली आणि गरीब पेशंटना उपयुक्त ठरणारी औषधे गोळा करून योग्य जागी पोहोचविण्यात तोगरे सतत सेवा करीत राहिले आहेत.ते सेवेचे व्रत करतांना त्यांनी काही दात्यांकडून धान्य,डाळ,कपडे गोळा करून गरजूंना दिले आहे. यावेळी आपल्या ७९ व्या वाढदिवशी तेली पाडा ( मुळेखंड ) येथील नव्या आदिवासी वस्तीवर जाऊन ४० घरकुलांना वरील वस्तूंचे वाटप केले , त्यामुळे वाडीला आनंद देणारा एक माणूस आहेत असा विचार साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल बी पाटील यांनी वाटप प्रसंगी उपस्थितांसमोर मांडला. दाते चंद्रकांत ठक्कर यांनी ही संग्राम यांचे विषयी गौरवोद्गार काढून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजसेवेत मदत करणा-या संग्राम यांच्या पत्नी सुमन तोगरे,कार्यकर्ते रवी काटे (केगांव ), नक्षत्रा संग्राम,उमाजी लक्ष्मण पवार इत्यादी प्रमुखांची उपस्थिती होती.वाडीवरच्या तेथील उपस्थितांनी संग्राम तोगरे दांपत्याला भरभरून सदिच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे