pub-7425537887339079
ब्रेकिंग

दिव्यांग बांधवांच्या अनेक प्रश्नासाठी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या मुक्रामाबाद व करडखेड बैठकीत दिव्यांग बांधवानी सहभागी व्हा अनिल रामदिनवार मगदुमसाब शेख ऊंद्रिकर यांचे आव्हान

0 5 3 0 1 9
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/प्रतिनिधी,दि 18

दिव्यांग, वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील (कुंचेलीकर) यांच्या अध्यक्षतेखाली मुक्रामाबाद व करडखेड परिसरातील दिव्यांग बांधवांची महत्त्वपूर्ण बैठकित दि. १९ सप्टे. रोजी मुक्रामाबादता. मुखेड सकाळी १० वाजता व करडखेड ता. देगलूर येथे दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत दिव्यांगांच्या प्रशासकीय छळाविरुद्ध नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना निवेदन देण्याचा आणि निवेदनातील मागण्यांवर १५ दिवसात लेखी उत्तर न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचे निवेदन नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकाना देण्याची माहिती व निवेदन देण्यासाठी जनजागृती मेळावे सर्कल वर घेतले जात आहे.
*ग्रामपंचायतीकडे करण्यात आलेल्या निवेदन आतील प्रमुख मागण्या :*

१) दिव्यांग कायदा २०१६ ची माहिती देण्यासाठी किती वेळा ग्रामसभा किंवा बैठक घेतली? त्याची रजिस्टर प्रतिसह माहिती देणे.
२) ग्रामपंचायतीकडील दिव्यांग प्रमाणपत्र नंबर व मोबाईल नंबर नोंद रजिस्टरची माहिती देणे.
३) सन २०१६ पासून आजपर्यंत दिव्यांगांसाठी राखीव ५% निधी किती वेळा वाटप केला? लाभार्थी, सही, वस्तू, रक्कम व मोबाईल नंबरसह रजिस्टर माहिती देणे. माहिती देता येत नसल्यास कारणासह खुलासा देणे.
४) व्यवसायासाठी शासकीय जागा (२०० फूट) किंवा गाळे किती दिव्यांगांना दिले? त्याची माहिती देणे.
५) रो.ह.यो. मध्ये काम देता येत नसेल तर १०० दिवसांचा भत्ता किती दिव्यांगांना मिळाला? त्याची माहिती देणे.
६) किती दिव्यांगांना घरकुल दिले? घरकुलासाठी किती प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवले? याबाबत बैठक घेतली का? याची माहिती देणे.
७) शासनाच्या विविध विभागांत दिव्यांगांसाठी असलेल्या ५% राखीव आरक्षणातून किती दिव्यांगांना लाभ मिळाला? त्याची माहिती देणे.
८) दिव्यांगांना व्यंगावरून बोलणे, मानसिक/शारीरिक त्रास देणे, घरावर-शेतीवर अतिक्रमण केल्यास दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२ नुसार गुन्हा दाखल होतो, याची माहिती दिली का? किती प्रकरणात गुन्हा नोंदवला? त्याची माहिती देणे.
९) बूथवर जाऊन मतदान करू न शकणाऱ्या दिव्यांगांसाठी घरोघरी मतदानाची सुविधा व नोंदणीबाबत माहिती दिली का? त्याची माहिती देणे.

वरील माहितीचे १५ दिवसांत समाधानकारक लेखी उत्तर व कृती न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत कार्यालयासमोर दालनात स्वेच्छामरणाच्या परवानगी साठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा गावागावातून निवेदनाद्वारे देण्याचा संकल्प मेळावात बैठकीत अनेक विषयांवर डाकोरे पाटिल मार्गदर्शन करनार आहेत. तरी मुक्रामाबाद व करडखेड परिसरातील दिव्यांग बांधवानी उपस्थित राहावे असे आव्हान नांदेड जिल्हा अध्यक्ष मनोहरराव येरपुरवार, जि. सचिव अनिल रामदिनवार, दक्षिण जिल्हा उपअध्यक्ष मगदुमसाब शेख ऊंद्रिकर, मुखेड ता. अध्यक्ष गणपत गौड, रवि ठाकुर, फेरोज पठाण, महेबुबसाब पठाण,
जावेद शेख, मोहसिन पठाण, ईत्यादी कार्यकर्त्यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 0 1 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे