pub-7425537887339079
ब्रेकिंग

इस्त्रोच्या अंतरिक्ष विज्ञानवाहिनीने विद्यार्थ्यांना दिली अवकाश विज्ञानाची प्रेरणा

0 4 6 0 6 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि अवकाश विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करण्याच्या उद्देशाने विज्ञान भारती व भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इस्त्रो अंतरिक्ष विज्ञानवाहिनी’ या विशेष विज्ञान प्रदर्शनाला जालना येथील कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भेट दिली. या विज्ञानवाहिनीमध्ये इस्रोच्या विविध अंतराळ मोहिमा, उपग्रह तंत्रज्ञान, रॉकेट प्रक्षेपण, अवकाश संशोधन, खगोलशास्त्र तसेच आधुनिक वैज्ञानिक प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मॉडेल्सच्या माध्यमातून देण्यात आली. इस्रोच्या पहिल्या उपग्रह मोहिमेपासून ते भारतीय अंतराळ केंद्र, प्रस्तावित भारतीय स्पेस स्टेशन, चांद्रयान-३, मंगळयान, गगनयान, विविध सिस्टीम मॉडेल्स तसेच बहुप्रतिक्षित चांद्रयान-४ मोहिमेची प्रतिकृती प्रथमच विद्यार्थ्यांना पाहण्याची संधी मिळाली. या आकर्षक प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि अवकाश संशोधनाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली. यावेळी विज्ञान भारतीचे राज्य समन्वयक अमोल कुंबलकर यांनी विद्यार्थ्यांना इस्रोच्या यशस्वी अंतराळ मोहिमा, भारताची वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यातील संशोधनाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासून विज्ञान क्षेत्रात करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या बालमनात विज्ञानाची आवड, संशोधनाची प्रेरणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या उद्देशाने विज्ञान शोध वाटिकेचे प्रा. सुरेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी यांच्यासह उपक्रमशील शिक्षक संदीप इंगोले, मदन सोजे, भीमाशंकर कुलकर्णी, राजाराम साबळे, अलकनंदा गाडेकर, प्रगती भालेकर, वंदना नन्नवरे आणि जगदीश डोंगरे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे