pub-7425537887339079
ब्रेकिंग

वेद रायगडाचा महाराष्ट्राचे प्रांत उपाध्यक्ष, प्राध्यापक दत्ता देशमुख यांचा सेवानिवृत्ती निमित्त, इतिहास प्रबोधन संस्था व वेद रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्रातर्फे सत्कार.

0 5 2 4 5 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/प्रतिनिधी, दि.19

टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील, नवभारत कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक, वेद रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रांत उपाध्यक्ष तसेच इतिहास प्रबोधन संस्थेचे 25 -26 या वर्षाचे अध्यक्ष प्राध्यापक दत्ता देशमुख टेंभुर्णीकर यांचा इतिहास प्रबोधन संस्था व वेद रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्र, तसेच इतिहासासंदर्भामधील सर्व अंतर्गत संस्था तर्फे सेवानिवृत्ती निमित्त नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वेद रायगडाच्या प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सर्वेसर्वा डॉक्टर रवींद्र पाटील, वेद रायगडाच्या प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सचिव भारतीताई साठे, इतिहास प्रबोधन संस्थेच्या वतीने सुद्धा संस्थेच्या सचिव भारतीयतेसाठी यांनी त्यांचा सत्कार केला. सत्कार प्रसंगी बोलताना डॉक्टर रवींद्र पाटील म्हणाले प्राध्यापक दत्ता देशमुख यांचा कार्य वेळ रायगडाचे प्रतिष्ठान महाराष्ट्र तसेच, शिवचरित्र पुष्पांजली निमित्त, याच प्रबोधन संस्थेचे सामाजिक कार्य, पहिले विश्व शिवचरित्र साहित्य संमेलन त्यांच्यासाठी योगदान महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर याप्रसंगी डॉक्टर रवींद्र पाटील, प्रसिद्ध चित्रकार संतोष बाबुराव आवटी, भारतीताई साठे यांनी त्यांचा कार्याचा गौरव गार केले. त्यांचं तळागाळातील कार्य अत्यंत महत्त्वाचा आहे असे सुद्धा सांगितले. या सत्कारासाठी ते जळगाव या मुख्यालय हून टेंभुर्णी येथे आवर्जून उपस्थित राहिले. भारतीताई साठे यांनी सुद्धा सत्कार प्रसंगी गौरव उद्गार काढले. या तिन्ही संस्थांच्या वतीने व अंतर्गत संस्थांच्या वतीने सर्व सदस्यांच्या शुभेच्छा सुद्धा याप्रसंगी त्यांना दिल्या. सेवानिवृत्तीनंतर या सर्व संस्थांचा कारभार व कार्य त्यांना आता अत्यंत जोमाने करता येईल असे त्यांनी याप्रसंगी भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना भावना वेळेस होऊन प्राध्यापक दत्ता देशमुख यांनी सुद्धा आपले विचार मांडले. सत्कार केल्याबद्दल धन्यवाद व आभार सुद्धा मानले. याप्रसंगी स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या मॅनेजर रेवती आवटी यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 5 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे