ग्रामपंचायत नवघर तर्फे ओएनजीसी कंपनीला घनकचरा उचलण्यासाठी घंटागाडीची मागणी दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत तर्फे मागणी व ठराव सरपंच आणि उपसरपंच यांनी ओएनजीसीला केला होता शिवसेना शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे आणि नितीन मढवी यांनी भेटून विनंती केली की आम्हाला घंटागाडीचे खूप आवश्यकता आहे आपण लवकरात लवकर घंटा गाडीच्या मागणीचा विचार करावा अशी विनंती करण्यात आली.त्यानंतर त्यांनी संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना जे काही पत्र किंवा माहिती पाहिजे सर्व देऊन त्यांनी पण आश्वासित केले होते की तुमच्या मागणीचा लवकरात लवकर विचार केला जाईल. एनजीओ संस्था आणि ओएनजीसी अधिकारी यांच्या सोबत शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे यांनी स्वतः सतत पाठपुरवठा, संपर्क केला. त्यांनी ग्रामपंचायतला नवीन एक चांगली घंटागाडीची व्यवस्था करून दिली.सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी ओएनजीसी कंपनी मध्ये या घंटागाडीचे उद्घाटन ओएनजीसी चे प्लांट मॅनेजर एस एन अहमद सर(CGM) आणि एस के मोहन सपोर्ट मॅनेजर उरण प्लांट यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी ओएनजीसी चे अधिकारी अभिषेक पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच सरपंच सविता मढवी,उपसरपंच प्रियदर्शनी म्हात्रे, नितीन मढवी, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, आतिश भोईर उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायतीतर्फे उद्घाटनाला आलेल्या ओएनजीसी अधिकारी यांचे शाल व फुलझाडे देऊन स्वागत करून सत्कार करण्यात आले.ही घंटागाडी उपलब्ध होण्यासाठी ओएनजीसीचे अधिकारी अभिषेक पाटील यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे विशेष सत्कार करून ग्रामपंचायत तर्फे आभार मानण्यात आले.तसेच भूमिका फाउंडेशनचे डॉक्टर विशाल गणर यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले. शिवसेना शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे यांनी ओएनजीसी अधिकारी आणि एनजीओ संस्थेशी सतत पाठपुरवठा संपर्क करून ओएनजीसी कडून ही नवीन घंटागाडी मिळण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल ग्रामपंचायतीतर्फे त्यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
अंबड मध्ये धान्याच्या काळ्याबाजारीवर मोठी कारवाई: काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 6.37 लाखांचा शासकीय/शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा जप्त; एकावर गुन्हा दाखल
15 hours ago
एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात २८ जुलै रोजी जाफ्राबादमध्ये विराट जनआक्रोश मोर्चासाठी विविध स्तरातून सहकार्याचा वर्षाव
15 hours ago
चित्रकार संतोष आवटी यांच्या वारीच्या 108 चित्र प्रदर्शनास वेद रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सर्वेसर्वा डॉक्टर रवींद्र पाटील यांच्या शुभेच्छा, आवटी यांचा सत्कार
15 hours ago
एकट्याने पंढरीची वारी; माजी सरपंचाचा अनोखा संकल्प
2 days ago
वीर वाजेकर महाविद्याल फुंडे चा अथर्व गाताडी भारतीय नौसेनेत अग्निवीर म्हणून निवड.
2 days ago
त्रिमुर्ती दिव्यांगाचा जन्म अभिष्टचिंतन व दिव्यांग मेळाव्यात आलेल्या दिव्यांगाचा सन्मान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या तर्फे सन्मान माहुर येथे उत्साहात संपन्न
2 days ago
सोनम वांगचुक यांचे दीर्घकालीन उपोषण बेदखल! – मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन!
2 days ago
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विशेष तपासणी मोहिमेत 60 बसेसची तपासणी व 26 वाहनांवर कारवाई 1 लाख 90 हजाराचा दंड वसूल
2 days ago
काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला आघाडीतर्फे अर्जुन पाटील यांना श्रद्धांजली पत्रकार कृष्णा पाटील परिवाराच्या सांत्वनासाठी पंचक्रोशीतील मान्यवरांची रिघ
2 days ago
जाफराबाद तालुक्यात वेळेत पाऊस. न झाल्यास खरीपला धोका ,, तालुक्यात बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत