pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथील मुळे कुटुंबाच्या तीन पिढ्या डॉक्टर व्यवसायात, अथर्व प्रदीप मुळे एमबीबीएस मध्ये उत्तीर्ण

0 4 6 0 6 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.12

टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना डॉक्टर दिगंबर राव मुळे ( नाना डॉक्टर) त्यानंतर त्यांचे पुत्र अरुण दिगंबरराव मुळे डॉक्टर व्यवसायात आहेत, त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अमोल अरुण मुळे व अथर्व प्रदीप मुळे तीन पिढ्यांचा हा वैद्यकीय व्यवसाय आहे. टेंभुर्णी मध्ये प्रसिद्ध लहान मुलांचे डॉक्टर हे होते. मुलांना कसलाही आजार होऊ द्या डॉक्टर नाना हेच होते. त्यांच्या हाताला एक दैवी शक्ती सुद्धा होती त्यांची दिलेल्या गोळ्या किंवा औषधी किंवा इंजेक्शन हे तात्काळ लागू होत होते. कमी पैशांमध्ये व्यवसाय करणारी एकमेव डॉक्टर म्हणजे डॉक्टर नाना. त्यांच्यानंतर त्यांचे न घरातील अरुण प्रदीप मुळे सुद्धा डॉक्टर व्यवसायात आले. त्यानंतर त्यांचा मुलगा अमोल हा सुद्धा डॉक्टर व्यवसायात आला. आता तिसऱ्या पिढीतील अथर्व प्रदीप मुळे हा सुद्धा डॉक्टर व्यवसायात आला. त्याचे डॉक्टर व्यवसायात घेण्याने सर्व मुळे कुटुंबात व गावातील अनेक मित्रमंडळींना आनंद झालेला आहे. याप्रसंगी नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक असलेले प्रदीप मुळे, व त्यांचे सुपुत्र अथर्व मुळे यांचा सत्कार नवभारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर, नवभारत शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक विश्वनाथराव सांगोळे, मुबारक शिक्षण संस्थेचे संचालक तथा वेध रायगडाचे प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रांत उपाध्यक्ष प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, संचालक प्रदीप काबरा, यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच टेंभुर्णी गावातील वैद्यकीय व्यवसायात प्रसिद्ध असलेले डॉक्टर रमेश मोठे यांनी सुद्धा डॉक्टर अथर्व व त्यांच्या वडील यांचा सत्कार केला. असेच या सर्वांनी त्यांच्या अभिनंदन केले याप्रसंगीअथर्व त्यांच्या आई यांचे आवर्जून उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे