pub-7425537887339079
ब्रेकिंग

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध; जाफ्राबादच्या गटशिक्षणाधिकारीपदी काजी टी. एफ. रुजू

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.23

जाफ्राबाद तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारीपदी काजी टी. एफ. यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. काजी हे सध्या जालना येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि प्रशासकीय कामातील उत्तम अभ्यास लक्षात घेऊन त्यांच्याकडे जाफ्राबाद गटशिक्षणाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास शिक्षक व शिक्षणप्रेमींनी व्यक्त केला आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर निकम, निवृत्ती दिवटे, उमेश दुनगहु, मुन्ना बिसेन, प्रभू गाढे, भगवान चव्हाण, काळे, संदीप कदम तसेच इतर शिक्षक बांधवांच्या उपस्थितीत काजी यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना, तालुक्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे तसेच शाळांमधील विविध

उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असून या गोष्टींनाच आपले पहिले प्राधान्य राहील, असे काजी यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी राम खराडे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी यापुढे विशेष प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील आणि गावखेड्यातील

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांची शिक्षणाविषयीची आवड निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, खेळ, आवडते छंद आणि त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना भरीव व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षक बांधवांनी एकत्र येत ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन खराडे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे