“live न्युज” च्या मागणीला यश.प्रशासनने घेतली दखल. स्पीड ब्रेकर बसविण्याचे काम सुरू.

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि 27
अपघाताची वाढती संख्या पाहून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जेव्हा दखल घेतं नाही या वेळी देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमानपत्राने बातमी देऊन प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ह्या चांगल्या कामाला सुरुवात झाली असून या कामाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले . जाफराबाद-टेंभुर्णी रस्त्यावर गतिरोधक बसवण्यास सुरुवात जाफराबाद : जाफराबाद-टेंभुर्णी मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर दखल घेत गतिरोधक बसवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या संदर्भात live news मध्ये बातमी लावत प्रशासन चे लक्ष्य वेधले होते. बातमीच्या माध्यमातून तसेच विविध वर्तमानपत्रांद्वारे सातत्याने आवाज उठवण्यात आला होता. नागरिकांनीही रस्त्यावरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत संबंधित विभागाने जाफ्राबाद-टेंभुर्णी रस्त्यावरील कलावती पोदार शाळेजवळ,अहिल्यादेवी होळकर चौक तसेच इतर धोकादायक ठिकाणी गतिरोधक बसवण्याचे काम हाती घेतले आहे. या मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असून, विशेषतः शाळा परिसर आणि चौकांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे गतिरोधक बसवण्याचा निर्णय हा नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत संबंधित विभागाचे आभार मानले आहेत. तसेच उर्वरित धोकादायक ठिकाणीही लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
—————————————————————
अजून बरेच स्पीड ब्रेकर लावण्याची गरज असून त्यावर पट्टे लावल्यास नक्की अपघाताचे प्रमाण कमी होईल.सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान असून या मुळे नक्कीच अपघात कमी होईल. – संजय लहाने


