pub-7425537887339079
ब्रेकिंग

खामखेडा शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वाटप

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खामखेडा येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. गावातील नागरिक, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली. नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुख्याध्यापक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शालेय उपक्रमांमध्ये सहभागाचे महत्त्व सांगितले. सहशिक्षक डोबले व शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पोलीस पाटील शाहरुख पठान, प्रकाश फदाट, योगेश फदाट, नितीन जाधव, प्रदीप सुसर, जगन फदाट तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे