उरणची वीज यंत्रणा ऍक्शन मोडवर. पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26
पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी उरण महावितरणतर्फे मान्सूनपूर्व देखभाल मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १० विभागांतील सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.सध्याही अनेक कामे महावितरण विभागाने हाती घेतले आहेत.पावसाळा पूर्वी सर्व कामे करणे हे त्यांचे लक्ष आहे. उपअभियंता विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. तसेच जीटीपीएस सब-स्टेशन ब्रेकर दुरुस्ती, मुख्य वीजवाहिन्यांतील सैल कनेक्शनची तपासणी व दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर देखभाल आदी कामे करण्यात आली. धोकादायक वीज खांब बदलण्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले. करंजा, मोरा आणि चिरनेर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली असून उर्वरित भागांत . टप्प्याटप्प्याने कामे केली जाणार आहेत. नागरिकांना पूर्वसूचना देऊन वारंवार माहिती दिली जात आहे.ज्या भागांत कामे होणार आहेत, तेथील नागरिकांना मोबाइल ऍपद्वारे पूर्वसूचना दिली जात आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर असून उरणची वीज यंत्रणा आता ऍक्शन दिसत आहे.




